शिवसेनेची झाली सोनिया सेना

शिवसेनेची झाली सोनिया सेना

शिवसेनेची पुरी सोनिया सेना झाली असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करत भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेने कोण कोणत्या अटी मान्य केल्या आहेत हे आता हळू हळू समोर येत आहे असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्रीपदाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली आणि मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले. तेव्हापासूनच सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले हा आरोप होत असतो. त्यातच आता शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये धर्मांतराची जाहिराती झळकल्यामुळे शिवसेनेवर टीकेची झोड उठली आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारचा तुघलकी निर्णय, १३०० कंत्राटी डॉक्टरांना केले सेवामुक्त

नालेसफाईचा दावा फोल, टक्केवारीच्या कारभाराचे भाजपाकडून पोस्टमार्टम

धनगर समाज आरक्षणासाठी जागर करणार

शिवसेना आमदाराच्या कार्यालयातूनच मद्य वाटप

आपल्या आक्रमक शैली साठी प्रसिद्ध असणारे भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर तोफ डागली आहे. काँग्रेसने चिनी कम्युनिस्ट पक्षाशी केला तसाच एखादा करार शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेससोबत केलाय का? असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे. मुख्यमंत्रत्रीपदाच्या बदल्यात शिवसेनेने काय काय अटी मान्य केल्या आहेत हे आता समोर येऊ लागले आहे असे भातखळकरांनी म्हटले आहे. ‘आधी सावरकरांचा अपमान झाला तरी चुप्पी साधायची आणि आता तर ख्रिश्चन होण्याच्या जाहिराती सामना मध्ये छापायच्या ही अट उघड झाली आहे’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. तर ‘शिवसेनेची पुरती सोनिया सेना झाली आहे’ असा घणाघातही भातखळकरांनी केला आहे.

तर दुसऱ्या आपल्या ट्विटमध्ये सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचा फोटो शेअर करताना ‘शिवसेनेने आता हिंदूत्वावादी असल्याचे पोकळ दावे बंद करावेत’ असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version