शिवसेनेचे गुंड पुन्हा मोकाट

शिवसेनेचे गुंड पुन्हा मोकाट

वाढीव वीज बिला विरोधातील आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी एका भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासलं होतं. या प्रकरणी अटक झालेल्या १७ शिवसैनिकांना अपेक्षेप्रमाणे जामीन मिळाला आहे. जामिनावर सुटका होताच त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जर पुन्हा कुणी शिवसेनेच्या नेतृत्वावर असभ्यपणे टीका केली तर यापेक्षा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. अशी स्पष्ट धमकीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

वीज बिल विरोधातील आंदोलनादरम्यान भाजपचे माजी उपजिल्हाअध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर कटेकर यांना गाठत काही शिवसैनिकांनी त्यांना काळं फासलं. त्याचबरोबर त्यांना साडी नेसवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार पोलिसांसमोर होत होता. शिवसेनेचे पंढरपूर शहर अध्यक्ष रवी मुळे ,संदीप केंदळे ,सुधीर अभंगराव, लंकेश बुरांडे सह २५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलाय. त्यातील १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना अर्थातच जामीन मंजूर झाला आहे.

शरजीलसमोर नांगी टाकणाऱ्या शिवसेनेची गुंडगिरी

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उदारमतवादी असल्याचा दावा करतात. केलेली टीका सहन करणे हा लोकशाहीतील राजकारण्यांसाठीचा एक महत्वाचा गुण आहे. आज अनेक आंदोलक आणि अनेक विरोधक नरेंद्र मोदींवर जहरी टीका करत असतात. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत सगल्ल्यांचा समावेश आहे. परंतु टीका केल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी कोणाला मारहाण केल्याची घटना आढळून येत नाही. याउलट गेल्याच वर्षी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला उद्धव ठाकरेंचे कार्टून शेअर केले म्हणून शिवसैनिकांनी मुंबईत मारहाण केली होती. या सर्व प्रकरणांवर ‘उदारमतवादी’ आदित्य ठाकरे गप्प राहिल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version