शिवसेनेला ‘हिंदुहृदयसम्राटांचा’ विसर….नावे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची

शिवसेनेला ‘हिंदुहृदयसम्राटांचा’ विसर….नावे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या निमंत्रण पत्रिकेवरून हिंदुहृदयसम्राट या शब्दाचा शिवसेनेला विसर पडला आहे. या कार्यक्रमानिमित्त बनवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर केवळ ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून शिवसेनेवर टीका केली जात आहे.

त्याबरोबरच या पत्रिकेतून अनेकांची नावे वगळण्यात आल्याने देखील शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले आहे. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्वीटर वरुन शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन… निमंत्रण पत्रिकेतून ‘हिंदुहृदयसम्राट’ गायब, MMRDA चे मंत्री एकनाथ शिंदे गायब, ज्यांच्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शक्य झाले ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गायब… नावे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची…..’ या शब्दांत अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानातील ऐतिहासिक मंदिराची धर्मांधांकडून नासधुस

ममतांवर ‘गोत्र’ सांगण्याची वेळ

दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांची उपस्थिती कमी व्हायला सुरूवात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन ३१ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता महापौर निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई मध्ये मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात कोरोनाचा नंगा नाच सुरु आहे, कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शासन, प्रशासन सोशल डिस्टंसिंगचे डोस देत आहेत. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक एकत्रीकरणावर बंदी आणली आहे. परंतु शिवसेनेला आणि मुख्यमंत्र्यांना हे नियम लागू होत नाहीत का? असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जात आहे.

Exit mobile version