भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारने निवडणुकीच्या आधी दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केली नाहीत असे म्हणत भातखळकरांनी सत्ताधारी शिवसेनेला फैलावर घेतले आहे. ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला लक्ष्य करताना भातखळकरांनी ‘निवडणूक सरली, आश्वासनं विरली’ असे म्हटले आहे.
देशभरात सध्या कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकार आल्या दिवशी केंद्रातील मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत असते. तर भारतीय जनता पार्टीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाते. तर अनेकदा महाराष्ट्र सरकारला विरोधी पक्ष म्हणून भाजपा धारेवर धरत असतो. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यात अग्रणी असतात.
हे ही वाचा:
सकारात्मक: देशातील कोरोना चाचण्या वाढल्या, रुग्णसंख्या घटली
वर्ध्यात तयार होणार म्युकरमायकोसिसवरील औषध
पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र
कोवॅक्सिनचे उत्पादन १० कोटी डोस प्रतिमहिना पर्यंत वाढवणार
शनिवार, १५ मे रोजीही भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. भातखळकर यांनी शिवसेनेचे निवडणुकीच्या वेळचे एक पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. या पोस्टरवर शिवसेनेकडून दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १०,००० रुपये जमा करण्याचे आश्वासन पक्षाने दिलेले दिसत आहे. यावरूनच अतुल भातखळकर आक्रमक झाले आहेत. “प्रधानमंत्री किसान सम्मान निधीतून महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत असतानाच पोस्टरबाज शिवसेनेने मात्र ‘निवडणूक सरली, आश्वासनं विरली’ हाच नारा गावागावात पोहोचवलाय. पण महाराष्ट्र जागा आहे… ” असे अतुल भातखळकरांनी म्हटले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून मोदी सरकार महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत असताना, पोस्टरबाज शिवसेनेने मात्र 'निवडणूक सरली, आश्वासनं विरली' हाच नारा गावागावात पोहोचवलाय. पण महाराष्ट्र जागा आहे… pic.twitter.com/NEKkQZa1Vj
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 15, 2021