23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणमैदानाला अनधिकृतरीत्या टिपूचे नाव देणाऱ्या सेनेला महात्मा गांधींच्या नावाचा विसर

मैदानाला अनधिकृतरीत्या टिपूचे नाव देणाऱ्या सेनेला महात्मा गांधींच्या नावाचा विसर

Google News Follow

Related

मुंबई महापालिकेची अतिशय चुरशीची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना मुंबई मधील मैदाने हा राजकीय मुद्दा ठरताना दिसत आहेत. मालाडमधील मालवणी भागातील मैदानाला मुस्लिम शासक टिपू सुलतानाचे नाव देण्याचा विषय ताजा असतानाच आता आणखीन एक नवा वाद समोर आला आहे. वरळी मधील एका मैदानाला महात्मा गांधींचे नाव देण्यात आले असूनही त्या नावाचा साधा फलकही त्या मैदानावर लावण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मालाडमधील मैदानाला अनधिकृतरित्या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे  देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला मात्र, वरळी बी.डी.डी. चाळीतील जांभोरी मैदानावर महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक लावण्याचे देखील भान उरले नाही असा आरोप भाजपाचे महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मैदानाचे लोकार्पण झाल्यावरही सत्तेसाठी धर्मांध शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्यांना महात्मा गांधींच्या नावचा विसर पडावा हे दुर्दैवी असल्याची टीका शिंदे यांनी आज स्थायी समितीत माहितीचा मुद्दा उपस्थित करत केली. मैदानात दहा दिवसामध्ये महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक न लावल्यास भाजपतर्फे गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी शिंदे यांनी दिला.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका…भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द

महाभकास आघाडी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा निर्णय

पाकिस्तानमध्ये आणखीन एका मंदिराची तोडफोड

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड

जांभोरी येथील मैदानास स्वातंत्र्य लढ्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पदस्पर्श झाला होता. स्वातंत्र्यानंतर या मैदानाचे नामकरण ‘महात्मा गांधी मैदान’ असे करण्यात आले. या मैदानाला ऐतिहासिक व हेरिटेज दर्जा प्राप्त झाला आहे. नुकतेच या मैदानाचे सुशोभिकरण करण्यात आले. राज्याचे पर्यावरण मंत्री यांच्या शुभहस्ते त्यांच्याच मतदार संघातील या उद्यानाचे लोकार्पणही करण्यात आले. परंतु या संपूर्ण मैदानाचे नूतनीकरण केल्यानंतर मैदानातील कुठल्याही प्रवेशद्वारावर अथवा पर्यावरण मंत्री यांच्या ट्विटमध्ये “महात्मा ‘गांधी मैदान’असा उल्लेख नाही. पर्यावरण मंत्री, महापौर, आयुक्त या ऐतिहासिक मैदानाचे नाव विसरलेत काय? क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या अनधिकृत नामफलकाला संरक्षण देणारे, आजही अनधिकृत नामफलक दिमाखात प्रवेशद्वारावर मिरवत ठेवणारे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते आता वरळीतील मैदानावर अधिकृत नामकरणाचा फलक ‘महात्मा गांधी मैदान’ असा त्वरित लावतील काय ? असा सवाल करत गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा