फडणवीस यांनी शिवसेनेवर केला प्रहार
कालपरवापर्यंत वीर सावरकरांचा ज्यांना जाज्ज्वल्य अभिमान होता, सावरकरांना भारतरत्न द्या म्हणत होते. त्यांची अवस्था अशी आहे की त्यांच्या मांडीला मांडी लावून जे बसले आहेत, ते सावरकरांवर रोज लाच्छंन लावत आहेत पण हे गप्प आहेत, अशा शब्दां विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली येथे झालेल्या प्रवचनकार, निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती व ५०व्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने परखड भाष्य केले.
फडणवीस म्हणाले की, यांच्या खासदारांना निलंबित करण्यात आलं. १२ खासदारांबरोबर शिवसेनेचे खासदार निलंबित झाले. माफी मागायला सांगितली, तेव्हा आम्ही सावरकर आहोत का, असा सवाल या खासदारांनी विचारला. तुम्हाला सावरकरांच्या नखाचीही सर नाही. ते तुम्ही होऊच शकत नाहीत. सावरकर होण्यासाठी तप करावं लागतं, तेजस्वी व्हावं लागतं. अंदमानच्या त्या कारागृहात अत्याचार सहन करतानाही सावरकर भारतमाता माता की जय म्हणत राहिले. सावरकरांचे नाव घेण्याचाही तुम्हाला अधिकार नाही. कोलुला जुंपण्यात आले, पण भारत माता की जय म्हणणं सोडलं नाही. त्या सावरकरांवर लांच्छन लावले जाते. पण ‘हे’ मिंधे झाले आहेत.
हे ही वाचा:
मिर्झापूरच्या ललितचा मृतदेह आढळला
ऑटिझमच्या मुलांसाठी कौशल्यविकासाचे ‘सोपान’
परमबीर सिंग यांच्या निलंबन आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी
धक्कादायक!! मुलीचे अपहरण नव्हे तर आईनेच केली हत्या!
फडणवीसांनी सांगितले की, राष्ट्रबाणा जागवायचा असेल तर जागृत व्हावं लागेल. आणि आम्हाला जागं करणारे शेवडेंसारखे प्रहरी आहेत. यांच्या विचारांच्या माध्यमातून राष्ट्र जागवावं लागेल. ज्या विचाराला मारण्याचा प्रयत्न होत आहे. आज त्या विचाराच्या बाजुने उभे राहणारे शेवडे यांचा सत्कार करतो आहे, याचा अभिमान आहे.