शिवसेना नेत्यानेच केले ठाकरे सरकारला लक्ष्य

शिवसेना नेत्यानेच केले ठाकरे सरकारला लक्ष्य

राज्यातील लस टंचाईचे खापर प्रशासकीय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यावर फोडत त्यांची तडकाफडकी बदली ठाकरे सरकारने केली. पण ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. कारण सरकारच्या या निर्णयाचा निषेध खुद्द मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना पक्षातले नेतेच करत आहेत. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची महाराष्ट्र सरकारमार्फत तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी परिमल सिंह यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विरोधी पक्षाच्या पुढाकाराने महाराष्ट्राला ब्रुक फार्मा या कंपनीकडून जो रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध होणार आहे, त्यासाठी काळे यांनी आवश्यक त्या परवानग्या दिल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्रातील मंत्र्यांची नाराजी होती अशी चर्चा आहे. याचाच परिणाम म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मुखाने काळे यांच्या बदलीची मागणी करण्यात आली. त्यानुसार काळे यांच्यावर बदलीची कारवाईसुद्धा झाली. पण या बदलीवरून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. आधी भाजपाकडून ही टीका होत होती, पण आता तर सत्ताधारी शिवसेनेला या बदलीवरून घरचा आहेर मिळू लागला आहे.

हे ही वाचा:

ऑक्सिजन, रेमडेसीवीरसाठी ठाकरे सरकारने काय केले?

 

सरकार आपली जबाबदारी झटकत आहे- उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारवर ताशेरे

माकप नेते सीताराम येचुरींच्या मुलाचे कोरोनामुळे निधन

भारतीय लसी कोविडवर ठरल्या भारी

गुरुवार, २ एप्रिल रोजी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी समाज माध्यमांवरून या बदलीच्या विरोधात आवाज उठवला आहे. “राज्यातील रेमडेसिवीर तुटवड्याचे खापर अभिमन्यू काळे यांच्यावर फोडत त्यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली अतिशय चुकीची व निषेधार्थ आहे.” असे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच आपण काळे यांना जवळून ओळखतो. त्यांनी कायमच राजकीय हितापेक्षा लोकहित डोळ्यासमोर ठेवून पदाला न्याय दिला आहे. त्यांनी न केलेल्या गुन्ह्याशी शिक्षा त्यांना मिळणे दुसरदेवी आहे. असे देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.

Exit mobile version