शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावल्यानंतर तिथे उपस्थित राहण्यापूर्वीच त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना गोरेगाव येथील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले. त्यांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
या हॉस्पिटलच्या आसपासच्या बाजूच्या परिसरामध्ये देखील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हॉस्पिटलमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांच एक पथकही दाखल झाले होते.
शिवसेनेचे माजी खासदार यांच्यावर आमदार रवी राणा यांनी सिटी सहकारी बँक घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर ईडीने चौकशीसाठी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना व त्याचा मुलाला ईडीने समन्स बजावले होते. आज त्यांना ईडी कार्यलायत हजर राहायचे होते. मात्र त्यांनी न्यायालयीन कामासाठी दिल्लीला जाण्याचे कारण पुढे करून चौकशीसाठी हजर राहता येणार नसल्याचे त्यांनी ईडीला कळवले होते.
दरम्यान, ईडीने आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरी छापेमारी सुरू करताच अडसूळ यांची तब्येत बिघडली व त्यांना उपचारासाठी गोरेगाव येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय परिसरात शिवसैनिक जमा झाले होते.
हे ही वाचा:
१५० सीसीटीव्ही बघून तीन चोरांचा काढला माग
युद्धात पाकिस्तानवर शौर्य गाजवणारा ‘वैजयंता’ सापडला रेतीबंदरच्या कचऱ्यात
…आणि त्याने छाटली भावाचीच बोटे!
धर्मांतरण करणारा अतिफ उर्फ कुणाल चौधरी उत्तर प्रदेश एटीएसला सापडला नाशिकमध्ये
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब आदिंना ईडीने नोटीस बजावली होती. दोघेही अद्याप ईडीसमोर हजर झालेले नाहीत. आता त्यात अडसूळ यांचीही भर पडली आहे.