31 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरराजकारणशिवसेनेचे महाविकास आघाडी विरुद्ध बंड?

शिवसेनेचे महाविकास आघाडी विरुद्ध बंड?

Google News Follow

Related

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मतदारसंघ खिशात घालण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर येथे महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सुरुवातीला येथे राष्ट्रवादी आणि भाजपा अशी थेट लढत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनीसुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी बैलगाडीतून येत मोठे शक्तीप्रदर्शन केले.

हे ही वाचा:

फोन टॅपिंगचा रिपोर्ट जितेंद्र आव्हाड, नवाब मलिकांनीच तयार केला

सनराईज कोविड सेंटरमधील मृत्यु शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी

नरेंद्र मोदींच्या बांग्लादेश दौऱ्याला सुरूवात

संजय राऊतांचे युपीए २ चे इमले

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी अपला उमेदवार कोण हे अद्याप जाहीर केले नाही. मात्र, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात धनगर समाजाच्या मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे येथे भाजपाकडून माजी मंत्री राम शिंदे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने आपला उमेदवार अद्याप जाहीर केला नसून येथे भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांनी उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा