स्वतःला हिंदुत्ववादी म्हणावणाऱ्या शिवसेने पुन्हा एकदा आपल्या कथनी आणि करनी मधला फरक दाखवून दिला आहे. जम्मू येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा कलम ३७० लागू करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या मागणीला घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्याच्या निमित्ताने ही निदर्शने करण्यात आली आहेत.
शनिवार, १९ ,मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या निमित्ताने जम्मू येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्या विरोधात निदर्शने केली आहेत. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीर या राज्यातीळ राष्ट्रपती राजवट काढून टाकावी अशी मागणी केली आहे. तर त्यासोबतच या प्रदेशाचा केंद्र शासित दर्जा काढून राज्याचा दर्जा पुन्हा लागू करण्यात यावा अशी मागणीही करण्यात अली आहे.
हे ही वाचा:
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं
अमित शाहांनी घेतला जम्मू काश्मीर मधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा
‘ज्या मलिकांनी शिवसेना भवनात स्फोट घडवला त्यांनाच शिवसेना वाचवतेय’
‘२४ महिन्यात ३६ इमारतींची खरेदी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी केली’
यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून कलाम ३७० पुन्हा लागू करून जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा पुन्हा एकदा बहाल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख हे ३७० हटवणे ही बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न असल्याचे सांगत असतानाच स्थानिक शिवसैनिक मात्र ३७० लागू करण्याची मागणी करताना दिसत आहेत.
शिवसेनेच्या या दुटप्पी वागण्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे. नेटकरी शिवसेनेच्या या धोरणासाठी त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सुप्रिया सुळे म्हणल्याप्रमाणे शिवसेना आणि MIM खरोखरच समविचारी आहेत. pic.twitter.com/kYVEMiRNGc
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 20, 2022