पणजीतून शिवसेनेने उमेदवार दिला पण उत्पल पर्रीकर लढत असतील तर…

पणजीतून शिवसेनेने उमेदवार दिला पण उत्पल पर्रीकर लढत असतील तर…

देशात पाच राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असून गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गोव्याच्या निवडणुकीसाठी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह सेनेचे बडे नेते प्रचारासाठी येण्याची शक्यता आहे.

भाजपाने उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी दिली नसल्याने संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये भाजपावर टीका केली होती. मात्र, आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पर्रीकर यांना भाजपाने उमेदवारी द्यावी किंवा नाही हा त्यांचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले आहे.

बहुचर्चित पणजीतून शिवसेनेने शैलेंद्र वेलिंगकर यांना उमेदवारी दिली आहे. तसेच पणजीतून उत्पल पर्रीकर हे निवडणूक लढवणार असतील तर शैलेंद्र वेलिंगकर उमेदवारी मागे घेणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांचं निधन

स्वतःच्या सुनेला अधिकार न देणारे तौकीर महिलांना काय न्याय देणार?

वडिलांच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार जास्त? सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

टी- २० वर्ल्डकप मध्ये भारत पाकिस्तान लढत होणार या दिवशी

गोव्याच्या राजकारणाबद्दल संजय राऊत यांनी भाष्य केले. गेल्या काही निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळाले नसले, तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करत आहे, असे संजय राऊत म्हणाले. २०१७ मध्येही गोव्यातील निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, आता गोव्याच्या जनतेसाठी राजकीय वातावरण गढूळ झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जनतेतील सामान्यातील सामान्य उमेदवारांना उमेदवारी द्यायची, जे आम्ही महाराष्ट्रात करतो. त्यामुळे त्या मतदार संघातील सामान्य चेहरे मैदानात उतरवायचे, अशी शिवसेनेची रणनीती असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version