सोशल मीडियावर चर्चा
बाबरी मशिदीचे पतन झाल्यावर देशात शिवसेनेची लाट आली होती. त्यावेळीच सीमोल्लंघन केले असते तर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील वक्तव्यावर आता प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. त्यात काहींनी त्या काळातील निवडणुकांची आकडेवारी शोधून उद्धव ठाकरे यांचे हे दावे फोल असल्याचे सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.
बाबरी मशीद पाडल्यानंतर १९९३मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये १८० जागा लढविल्या होत्या. पण त्यातील १७९ जागांवर शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. या १८० उमेदवारांपैकी एका उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यानंतरच्या १९९६च्या निवडणुकीत २४ पैकी २३ जागी शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले होते तर २००२मध्ये ३९ पैकी ३९ जागी शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी रविवारी ऑनलाइन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचेच मोठे योगदान होते आणि त्यामुळे तेव्हा देशभरात शिवसेनेची एवढी लाट आली होती की, तेव्हाच शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता.
हे ही वाचा:
रेल्वेचालक अडीच तास निवांत झोपला आणि गाडी लेट झाली!
रतन टाटांना ‘आसाम वैभव’ पुरस्कार
पंजाब निवडणुकीसाठी असा असणार भाजपचा फॉर्म्युला
जगात ठरली भारताची काकडी श्रेष्ठ…
या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. त्यावर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार टीका करत त्यांच्या भाषणाला प्रत्युत्तर दिले. राममंदिराच्या वेळी आम्ही लाठ्या खाल्ल्या आणि राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे उभे राहिले असे फडणवीस म्हणाले.