29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाशिवसेना नगरसेवकाची गुंडगिरी, लोखंडी रॉडने तरुणाला मारहाण

शिवसेना नगरसेवकाची गुंडगिरी, लोखंडी रॉडने तरुणाला मारहाण

Google News Follow

Related

शिवसेना नगरसेवकाकडून गुंडगिरी करत एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथमध्ये हा प्रकार घडला असून, या प्रकरणात शिवसेना नगरसेवक आकाश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात सध्या कोविडचे तांडव सुरू असून त्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता राज्यात सर्व कारभार ठप्प आहे. तसेच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. पण तरीही अनेक ठिकाणी नागरिक या नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना मंगळवारी अंबरनाथ येथे घडली.

हे ही वाचा:

शिवसेना नेत्याने लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले

मुख्यमंत्र्यांचा नौटंकी दौरा

उजनीचा पाणी प्रश्न पेटला, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन

अनेक महिने महाराष्ट्रात लॉकडाऊन ठेवणार का?

जुना अंबरनाथ गाव परिसरातील धर्माजी पाटील कॉलनी या भागात राहणारा रवी जैसिंघानी हा तरुण रात्री सव्वा बाराच्या आसपास घराबाहेर एकटा फिरत होता. शिवसेना नगरसेवक आकाश पाटील हे देखील त्यावेळी रस्त्यावर होते. आकाश पाटील यांच्यासोबत त्यांचे साथीदार यश आणि मनिष हेदेखील दोघे होते. त्यांच्या नजरेस हा तरूण पडला.

त्यांनी रवी जैसिंघानीला अडवले आणि ‘तू बाहेर का फिरतोस?’ असा सवाल केला. त्यानंतर लगेचच आकाश पाटील यांनी आपल्या कंबरेचा पट्टा काढून रवीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आकाश पाटील यांच्या साथीदारांनी देखील रवीला जबर मारहाण केली. लोखंडी रॉड घेऊन रवीच्या छातीवर आणि पोटावर वार करण्यात आले. त्याबरोबरच त्याच्या पायावर देखील रॉडने फटके मारण्यात आले. या मारहाणीत रवीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या शरीरावर काळे-निळे डाग उमटले आहेत. त्यानंतर रवीला एका स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पण रुग्णालयात दाखल होण्याआधी रवीने अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जाऊन या सार्‍या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी नगरसेवक आकाश पाटील आणि त्यांचे साथीदार यश पाटील आणि मनीष यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पण अद्याप या नगरसेवकाला अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान या प्रकरणावरून राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेने विरोधात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात टीकेची झोड उठली आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकच कायदा हातात घेऊन नागरिकांना मारहाण करत असतील, तर जनतेने अपेक्षा कोणाकडून करायची? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा