मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड पुकारले. त्यानंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि या आमदारांनी वेगळी वाट चोखाळली. पुढे एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. त्यावेळी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर शिवसेनेच्या सामना वर्तमानपत्रातून शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी आली होती. मात्र, आता या बातमीवर शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, सामना दैनिकात ३ जुलै २०२२ रोजी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविषयीची बातमी अनावधानाने छापण्यात आली होती. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत.
हे ही वाचा:
सामाजिक संदेश देणारा ‘व्हॅलिअंट फेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र २०२२’ शो
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचे कौतूक
राहुल नार्वेकरांच्या पाठीशी राजकारणाचा वारसा
‘पारदर्शक पद्धतीने आम्ही राज्याचा कारभार चालवणार’
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांसोबत बंड पुकारले. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनतर एकनाथ शिंदे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यंमत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यांनतर एकनाथ शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात होते. यादरम्यानच पक्षप्रमुखांचा फोटो न वापरता बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्यानंतर आणि त्यांचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले जात होते. आढळराव पाटील यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र विनायक राऊत यांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे.