उद्धव ठाकरेही आता ‘सामना’ वाचत नाहीत

उद्धव ठाकरेही आता ‘सामना’ वाचत नाहीत

‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र असले तरी आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील आता आपले मुखपत्र वाचण्याच्या फंदात पडत नाहीत. ही बातमी दिली आहे, दस्तुरखुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी.

एका पत्रकार परिषदेदरम्यान पटोले यांनी हा गौप्यस्फोट केला. पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणतात की, स्वतः मुख्यमंत्रीच मला म्हणाले की, तेच हल्ली ‘सामना’ वाचत नाहीत. कुठे वेळ आहे नाना मला. त्यावर पटोले त्यांना म्हणाले की, असं करू नका. तर म्हणाले की, मी पण वाचत नाही.

हे ही वाचा:

साऊदम्पटनमध्ये आजही पाऊस व्यत्यय आणणार?

राममंदिरचे सरचिटणीस चंपत राय यांच्याविरोधातील पोस्टसंदर्भात तिघांवर गुन्हा

प्रदीप शर्मा आणि अन्य चौघांच्या समोर सुनील मानेची चौकशी

शरद पवार-प्रशांत किशोर पुन्हा झाली भेट

हे सांगितल्यावर पटोले पत्रकारांना म्हणाले की, सामनाचा उल्लेख करू नका, नाहीतर संजय राऊतांशी भांडण व्हायचे.

यासंदर्भात भाजपा मुंबईने ट्विट करून खिल्ली उडविली आहे.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ऐकून आश्चर्य वाटेल, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सामनाला किंमत देत नाहीत. हा गौप्यस्फोट केला आहे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी. संजय राऊत यांना मनावर घेणारे आता कुणी उरले नाही, म्हणून उठसूट भुवया उडवत मीडियाकडे मोकळे होत असतात बहुधा.’

महत्त्वाचे म्हणजे आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या ‘सामना’च्या संपादक आहेत. सध्या ‘सामना’ची भूमिका म्हणजेच शिवसेनेची भूमिका असे समीकरण बनले आहे. ‘सामना’त प्रसिद्ध झालेला अग्रलेख सकाळीच सगळ्या वाहिन्यांवर दाखवला जातो, पण मुख्यमंत्र्यांना मात्र तो वाचावासा वाटत नाही.

Exit mobile version