भाजपाच्या पोल खोलमुळे दहिसरमध्ये शिवसेना बिथरली

भाजपाच्या पोल खोलमुळे दहिसरमध्ये शिवसेना बिथरली

मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) वेगवेगळ्या प्रभागांमध्ये पोल खोल अभियान सध्या सुरू आहे. मात्र, या अभियानामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बुधवार, २० एप्रिल रोजी दहिसरमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी दहिसरमध्ये शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद रंगला आहे.

दहिसरमधील शिवसेना नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या प्रभागात भाजपाने पोल खोल अभियान राबवले होते. हे त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. तेव्हा त्यांनी आक्रमकपणे आपल्या प्रभागात पोल खोल अभियानासाठी बांधलेल्या स्टेजवर आक्षेप घेतला आहे. तसेच हा स्टेज अनधिकृतपणे बांधल्याचा आरोप त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये केला आहे. तसेच भाजपा नगरसेवक जगदीश ओझा आणि इतर भाजपा पदाधिकारी याला विरोध करताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

शांतनू गुप्ता लिखित, मल्हार पांडे अनुवादित ‘भाजपा : काल, आज, उद्या’ या पुस्तकाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन

कुतुबमिनारजवळच्या मशिदीसाठी उद्ध्वस्त केली होती २७ मंदिरे

दिल्लीत मास्कसक्ती, मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड

कुमार विश्वास यांच्या घरी पोहचले पोलीस; ट्विट करत मुख्यमंत्र्यांना दिला इशारा

याआधी काल चेंबूरमधील भाजपाच्या पोल खोल अभियानाच्या रथाची तोडफोड करण्यात आली आल्याचे समोर आले होते. ही तोडफोड महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा संशय भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला होता. पोल खोल अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय म्हणून ही तोडफोड केलेली आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले होते. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.

Exit mobile version