संभाजी महाराजांची ठरवून कोंडी

संभाजी महाराजांची ठरवून कोंडी

संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीत माघार घेतल्यांनंतर या विषयावरून आता महाराष्ट्राचे राजकारण तापताना दिसत आहे. संभाजी महाराज यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर फसवणूक केल्याचे आरोप केले. तर यावरूनच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारवर हल्ला चढवला आहे. संभाजी महाराजांची ठरवून कोंडी करण्यात आल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. पुणे येथे फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काय म्हणाले फडणवीस?
संभाजी महाराजांची ज्याप्रकारे कोंडी करण्यात आली हे आपण पहिले आहे. पहिल्यांदा पवार साहेबांना नीट माहिती होतं की जागा त्यांच्याकडे नाही. त्यांच्या कराराप्रमाणे शिवसेनेकडे ही जागा आहे. तरी त्यांनी जाणीवपूर्वक आम्ही संभाजीराजेंना पाठिंबा देऊ, आमची अधिकची मते त्यांना देऊ असं सांगून एक चित्र निर्माण केले. त्यानंतर सांगितले की आमच्याकडे तर जागा नाही, ती शिवसेनेकडे आहे आणि आम्ही शिवसेनेला सांगू.

हे ही वाचा:

‘हिंदुत्व धर्म नही इतिहास है’! ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

प्रियांका गांधी दिसणार राज्यसभेत?

जवानांना घेऊन जाणारी बस नदीत पडली, ७ जवान मृत

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौटालांना चार वर्षांचा तुरुंगवास

मग शिवसेनेने सांगितले की आम्ही संभाजी राजेंना या ठिकाणी मदत करायला तयार आहोत . संभाजीराजांनी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की आपण सगळ्यांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा. पण त्यांच्याशी चर्चा करून बातम्या पेरण्यात आल्या की १२ वाजता संभाजीराजे शिवबंधन बांधणार. त्यानंतर नेहमीच्या सवयी प्रमाणे माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांचा फोन उचलला नाही. ते कायम असंच वागतात आणि त्याच्यानंतर व्हिक्टीम कार्ड शिवसेनेच्या वतीने प्ले केला जातो.

मात्र ठरवून संभाजी राजेंची कोंडी करण्यात आली असे स्पष्ट झाले. म्हणूनच ही बाब संभाजीराजेंनी स्पष्ट केली. जेव्हा मला संभाजीराजे भेटायला आले होते तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं होतं की सगळे मला समर्थन देतील आणि तुम्हीही मला समर्थन द्या. तेव्हामी त्यांना सांगितले होते की सगळे तयार असतील तर मी आमच्या हायकमांडशी नक्की बोलेन. पण त्यानंतर काय घडले हे आपण पहिलेच.

Exit mobile version