पुतण्यावर नाराज असलेले शिवपाल सिंह मुख्यमंत्री योगींच्या भेटीला

पुतण्यावर नाराज असलेले शिवपाल सिंह मुख्यमंत्री योगींच्या भेटीला

प्रगतीशील समाजवादी पार्टी (लोहिया) नेते आणि अखिलेश यादव यांचे काका शिवपाल सिंह यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौ येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर शिवपाल सिंह म्हणाले की, ही भेट केवळ सदिच्छा भेट होती. मात्र, ही भेट अशा वेळी झाली जेव्हा ते त्यांचे पुतणे आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिवपाल यादव यांनी इटावामधील जसवंतनगर मतदारसंघातून सपाच्या निवडणूक चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. मंगळवारी अखिलेश यादव आणि सपाच्या मित्रपक्षांमध्ये झालेल्या बैठकीला ते उपस्थित राहिले नव्हते. मात्र, या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचे शिवपाल यांनी सांगितले. मी दोन दिवस वाट पाहिली आणि या सभेसाठी माझे सर्व कार्यक्रम रद्द केले पण मला निमंत्रित करण्यात आले नाही.

हे ही वाचा:

पाच तासांच्या तपासानंतर सतीश उकेंना ईडीने घेतलं ताब्यात

‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’

‘नवाज शरीफ यांनीच भारताला अजमल कसाबचा पत्ता दिला’

व्हीआयपींच्या सेवेत गुंतलेल्या वन अधिकाऱ्यांना कर्तव्याचा विसर!

सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या वागण्याने शिवपाल हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. निवडणुकीत शिवपाल यांनी अखिलेश आणि सपाच्या समर्थनार्थ प्रयत्न केलेत. स्वत:च्या पक्षाचा त्याग करूनही ते स्वत: ‘सायकल’ या चिन्हाने लढले. अखिलेश यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींना तिकीट मिळावे यासाठी दिलेल्या यादीतून एकही तिकीट दिलेले नाही. या सर्व बाबींमुळे शिवपाल नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

Exit mobile version