शिवसेनेचे तीन मजली नमाजप्रेम

शिवसेनेचे तीन मजली नमाजप्रेम

नाशिकमध्ये मुस्लिम समाजााला नमाज पढायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने त्यांना नमाज पढण्यासाठी तीन मजली इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. यामुळे आता नाशिक मधील मुस्लिम समाजाला नमाज पढण्यासाठी हक्काचे स्थान मिळणार आहे.

हे ही वाचा:

“बेकायदेशीरपणे बजेट अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रस्ताव” – देवेंद्र फडणवीस

नाशिक रोड परिसरातील मुस्लिम समाजाला नमाज पढण्यासाठी जागा अपुरी पडत होती. त्यांनी पर्यायी जागेचा शोध घेतला पण त्यात त्यांना यश आले नाही. अखेर त्यांच्यासाठी स्थानिक शिवसेना नेत्या सत्यभामा गाडेकर धावून आल्या. गाडेकर या शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या महिला प्रमुख असून त्या नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. त्यांनी या विषयावर तोडगा काढून नमाजासाठी इमारत उभारण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला नागरिकांनी मान्यता दिली असून महापालिकेनेही हा प्रस्ताव मंजूर केला आहे. या इमारतीसाठी १ कोटी रूपयांचा निधी वापरला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करून महाराष्ट्राची सत्ता संपादन केल्यापासून शिवसेनेने मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी चांगलेच प्रयत्न चालवले आहेत. अजान स्पर्धा आयोजित करणे, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख ‘जनाब’ असा करणे यांसारखी उदाहरणे असतानाच त्यात आता या नमाज इमारतीने भर घातली आहे.

Exit mobile version