मुंबई महापालिका निवडणूक वर्षभरावर आलेली असताना शिवसेनेने उर्दू भवन बांधण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. मुंबई मधील भायखळा भागात उर्दू भवन बांधण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. महानगरपालिका निवडणूकांवर डोळा ठेवून मुस्लिम मतांना चुचकारण्यासाठी शिवसेनेकडून ही मागणी करण्यात येत आहे. यासाठी तब्बल दिड कोटी रुपयांचा निधीचे नियोजन करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात मध्य मुंबईत ‘डब्बावाला भवन’ बांधण्यासाठी तरतूद करण्यात आली. यानंतर स्थायी समितीचे सभापती असलेले शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांनी उर्दू भवनसाठीही निधीची तरतूद करण्यात येईल अशी घोषणा केली. यासंबंधीची अर्थसंकल्पीय तरतूद स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात येईल.
हे ही वाचा:
सचिन वाझे यांना पंचवीस मार्च पर्यंत एनआयए कोठडी
ये सचिन वाझे चीज क्या है?- किरीट सोमैय्या
सुशांतच्या प्रकरणातील गुपितांमुळे वाझेंचा बचाव?
या प्रस्तावित उर्दू भवनात संशोधन केंद्र, सभागृह आणि ग्रंथालय असणार आहे. उर्दू भाषेतील प्रभुत्वासाठी हे केंद्र बनेल असे सांगितले जात आहे. या भवनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देण्यात येईल. या केंद्राचे बांधकाम याच वर्षी सुरु होणार आहे. २०१७ च्या महानगरपालिकेच्या वचननाम्यात शिवसेनेने डब्बावाला भवन बांधून देण्याचे वचन दिले होते. ते फक्त आजवर फक्त कागदावरच राहिले आहे.
शिवसेना सध्या आपले पारंपरिक मुद्दे सोडून नवीन मतदारांना आकर्षित कारण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यासाठी गुजराथी आणि मुसलमान समाजाला आपल्या बाजूने वाळवण्यासाठी शिवसेना वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसत आहे.