26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणमुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांच्या पुनर्रचनेत शिवसेनेचा डाव

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांच्या पुनर्रचनेत शिवसेनेचा डाव

Google News Follow

Related

बीएमसीच्या प्रभाग रचना स्वरूपाची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. राज्य सरकारने मुंबईतील वॉर्डांची संख्या २२७ वरून २३६ पर्यंत वाढवली आहे. राजकीय फायद्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या नऊ जागांपैकी शिवसेनेचे आमदार असलेल्या परिसरात सहा नवीन जागा वाढवण्यात आल्या आहेत. या नऊ नव्या जागांच्या बहाण्याने महानगरातील सर्व २२७ वॉर्डांच्या पुनर्रचनेत भाजपच्या व्होट बँक वॉर्डांची विभागणी करून विरोधकांचे नुकसान केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रभागांच्या हद्दीचा नकाशा जाहीर झाला आहे. यावर राज्य निवडणूक आयोगाने लोकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. नऊ नवीन विस्तारित वॉर्डांपैकी तीन मुंबई शहरात, तीन पश्चिम उपनगरात आणि तीन पूर्व उपनगरात आहेत. हे सर्व नवे नऊ प्रभाग शिवसेनेच्या प्रभावक्षेत्रातील आहेत. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला चेंबूर गोवंडीत प्रभाग वाढणार आहेत.

हे ही वाचा:

Budget 2022 : काय स्वस्त काय महाग?

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर सिंधुदुर्ग न्यायालयाबाहेर राडा

‘भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प’

Budget 2022 : गंगाकिनारी रसायनमुक्त शेतीला देणार चालना

या २३६ प्रभागांपैकी २१९ सर्वसाधारण तर १५ अनुसूचित जाती आणि दोन अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. त्यापैकी १२७ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यापैकी आठ अनुसूचित जाती आणि एक जागा एसटी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबोसी आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसाधारण जागांची संख्या वाढली आहे.

मुंबई उपनगराची लोकसंख्या मागील काही वर्षात वाढली आहे, त्यामुळे मंत्रिमंडळात नऊ प्रभाग वाढवले आहेत. त्यानुसार २३६ प्रभागाचा सुधारित आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे गेल्या आठवड्यात सादर करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा