लोकसभेचे शिवसेनेचे गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे नेमले जाणार आहेत. तसेच प्रतोदपदी खासदार भावना गवळी कायम राहणार आहेत. यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आज, १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला शिवसेनेच्या बारा खासदारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली आहे.
यादरम्यान, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे १२ खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून आपला नवा गट स्थापन करणार आहेत. तसेच या नव्या गटाचे संसदेतील नेते म्हणून राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला १२ खासदार उपस्थित
शिवसेना नेते रामदास कदम यांचा राजीनामा
राज्य शासनाकडून अपघातग्रस्तांना १० लाखाची मदत जाहीर
“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”
दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रं देऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची जाहीर मागणी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला. राष्ट्रपती निवडणूक पार पडल्यानंतर बारा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला उपस्थिती लावली होती.