शिवसेनेचा प्रवास ‘वसंत’ सेना ते ‘शरद’ सेना

शिवसेनेचा प्रवास ‘वसंत’ सेना ते ‘शरद’ सेना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा होणार असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दखल झाले आहेत. ठाण्यातील उत्तर सभेसाठी मनसेकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. वसंत सेना ते पवार सेना असा शिवसेनेचा प्रवास असल्याची गंभीर टीका देशपांडे यांनी केली आहे.

देशपांडे म्हणाले की, शिवसेना हळूहळू संपत चालली असून, शिवसेना म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून ‘ढ’ सेना झाली आहे. शिवसेना प्रमुखांचा विचार शिवसेनेकडून संपवला जात आहे. तर आधी शिवसेनेला वसंत सेना म्हटलं जायचं तीच वसंत सेना आता शरद सेना झाली असल्याची गंभीर टीका देशपांडेंनी केली आहे. शिवसेनेने आता भगवा बाजूला ठेवावा कारण ज्या भगव्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना चालू केली होती, जो आधी विचार होता तो आता उरलेला नाही, असे देशपांडे म्हणाले आहेत.

तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची नक्कल करत देशपांडेंनी आदित्य ठाकरेंवर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र सैनिकांना आवाज द्यायचा नाही. आम्ही प्रभू रामचंद्रांचे सैनिक आहोत, असे देशपांडे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

‘दहशत माजवण्याचा मविआ कडून प्रयत्न’

ती तरुणी खोटे का बोलत आहे माहीत नाही, पण मी अजूनही तिच्या पाठीशी!

वंचितच्या सुजात आंबेडकरांनी ब्राह्मणांना केले लक्ष्य

कुचिक बलात्कार पीडित तरुणीचे चित्रा वाघ यांच्यावर आरोप

दरम्यान, मनसेकडून सभेपूर्वी तीन टीझर रीलीज करण्यात आले होते. ९ एप्रिल रोजी मनसेकडून कारारा जबाब मिलेगा #उत्तर सभा अशी टॅग लाईन देत एक टीझर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आज ”वारं खुप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलेच आहे” असा उल्लेख करत दुसरा तर, त्यानंतर लाव रे तो व्हिडिओ असा उल्लेख करत तिसरा टीझर रिलीज करण्यात आला होता.

Exit mobile version