टिपूला डोक्यावर घेऊन नाचण्याचे कसले उफराटे राजकारण

टिपूला डोक्यावर घेऊन नाचण्याचे कसले उफराटे राजकारण

भाजपाने शिवसेनेला विचारला जाब

समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेने गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतान उद्यान हे नाव ठेवण्याच्या प्रस्तावास विरोध न करता उलट तो प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठविण्यात आल्यामुळे शिवसेनेचा या प्रस्तावाला छुपा पाठिंबा आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी या विषयावर शिवसेनेला घेरले आहे.

 

भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी या विषयावर ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. “टिपू जयंती साजरी करणाऱ्या शिवसेनेने आता गोवंडीत उद्यानाला टिपूचे नाव देण्याच्या प्रस्तावाला छुपा पाठिंबा दिलाय. हिंदुत्वाचा टिळा लावायचा हिंदूंच्या कत्तली करणाऱ्यांना खांद्यावर घेऊन नाचायचे, असे उफराटे राजकारण शिवसेनेने सुरू केले आहे.” असं ट्विट भातखळकरांनी केलं आहे.

मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनीही ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “मुंबईतील एका उद्यानाला “टिपू सुलतान”चे नाव देण्याचा घाट शिवसेनाशासित बीएमसीने घातला आहे, ही अत्यंत दुःखद बाब आहे. हिंदूंचा संहार करणारा, छत्रपतींच्या पेशव्यांविरोधात लढलेला टिपू सुलतान महाराष्ट्रात कशा प्रकारे आदरणीय असू शकतो? जागे व्हा! नाहीतर हे विष महाराष्ट्र भर पसरेल!” असं ट्विट मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

हे ही वाचा:

लवकरच मोदी सरकारकडून एलआयसी आयपीओ बाबत निर्णय?

मोदींकडून वाराणसीत १५०० कोटींची विकासकामे

भारताच्या ‘या’ खेळाडूला कोरोनाची लागण

सरकारचे बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष

तर मुंबई भाजपानेही शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. “गोवंडीत उद्यानाला टिपूचे नाव देण्यासाठी सपा आणि शिवसेनेची छुपी युती. शिवसेनेने टिपूचा उदो उदो करते आहे. टिपू एवढा थोर होता तर स्वराज्याचे पेशवे त्याच्याविरुद्ध का लढले? हाती हिरवा झेंडा घ्या मग टिपूचा जय जयकार करा. भगव्याला विटाळू नका.” असं ट्विट मुंबई भाजपाने केले आहे.

Exit mobile version