24.6 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरक्राईमनामा'ज्या मलिकांनी शिवसेना भवनात स्फोट घडवला त्यांनाच शिवसेना वाचवतेय'

‘ज्या मलिकांनी शिवसेना भवनात स्फोट घडवला त्यांनाच शिवसेना वाचवतेय’

Google News Follow

Related

ज्या नवाब मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यांनाच वाचवण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुढे आले आहेत,अशी खळबळजनक टीका भारतीय जनता पार्टीच्या आमदार श्वेता महाले यांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक हे मनी लौंड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यामुळे भाजपा कडून त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. एवढे दिवस झाले तरी ठाकरे सरकारने मलिकांचा राजीनामा घेतलेला नाही. शिवसेनेचे हिंदुत्व फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापूरते राहिले आहे. ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस बरोबर सत्तेत बसली, त्याच दिवशी त्यांनी हिदुत्वाला लाथ मारली, अशीही टीका महाले यांनी केली आहे.

या विषयावर टीव्ही9 शी बोलताना त्या म्हणाल्या, ” हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले त्यांनी शिवसेना मोठी केली. त्याच हिंदुत्वाला आजची शिवसेना विसरली आहे. त्यामुळेच काँग्रेससोबत जाणारी शिवसेना उद्या जर एमआयएमसोबत गेली तर आश्चर्य वाटायला नको. ज्या नवाब मलिकांनी मुंबईत, शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवून आणले. त्याच मलिकांना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. हे दुर्देवी आहे, शिवसेनेचे हिंदुत्व सत्तेच्या हव्यासापोटी निघून गेले आहे,”अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाचा:

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

अमित शाहांनी घेतला जम्मू काश्मीर मधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा

टाटा घेऊन येणार नवे डिजिटल पेमेंट ऍप

‘२४ महिन्यात ३६ इमारतींची खरेदी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी केली’

मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर मलिक सध्या तुरंगात आहेत. मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आक्रमक पवित्र घेतला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा मुद्दा भाजपाने उचलून धरला होता. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही काळ याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा