विधानभवनातील शिवसेना कार्यालय सील

विधानभवनातील शिवसेना कार्यालय सील

महाराष्ट्र विधानभवनात शिवसेनेला दिलेले कार्यालय सील करण्यात आले आहे. कार्यालयावर एक नोटीस चिकटवण्यात आली असून त्यावर ‘शिवसेना पक्षाच्या आदेशानुसार हे कार्यालय बंद करण्यात आले आहे’,असे लिहिले आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची सूचना लिहिण्यात आली आहे. मात्र, ही सूचना कोणी दिली, याबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

शिवसेना विधिमंडळ पक्षाकडून कार्यालय सील करण्यात आल्याचे नोटीसमध्ये लिहिले आहे. मात्र, हे कार्यालय शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून की उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून सील करण्यात आले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कार्यालय बंद असल्याने कार्यालयातील कर्मचारी सकाळपासून कार्यालयाबाहेरच बसून आहेत. एकनाथ शिंदे आपल्यासोबतच्या ४० आमदारांसह बाहेर पडल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत कलह निर्माण झाला. त्यामुळे तो कलह या शिवसेना कार्यालयात पोहोचू नये म्हणून हे कार्यालय सील करण्यात आले असावे.

हे ही वाचा:

शिवसेनेचा बॉस कोण? शिंदे की ठाकरे?

विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर यांची प्रचंड बहुमताने निवड; राजन साळवींना फक्त १०७ मते

पंतप्रधान मोदी ७ जुलैला वाराणसी दौऱ्यावर

अमरावती हत्या प्रकरणातील सूत्रधार इरफान खान जेरबंद

महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड झाली असून भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. अध्यक्षपदासाठी नार्वेकर यांना १६४ मतं तर मविआचे उमेदवार राजन साळवी यांना फक्त १०७ मतं पडली आहे. राहुल नार्वेकर यांना भाजपा, शिवसेना, मनसेचे आमदार राजू पाटील आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी मतदान केले आहे. त्यांनतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र, आजच्या या निवडणुकीतच बहुमत भाजपा-शिवसेनेकडे असल्याचे सिद्ध झाले आहे.

Exit mobile version