शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्री भेटत नव्हते…शिवसेनेच्या आमदारांनी लिहिले पत्र

शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्री भेटत नव्हते…शिवसेनेच्या आमदारांनी लिहिले पत्र

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने घडामोडी सुरु आहेत. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेना आणि अपक्ष ४० हुन अधिक आमदार आहेत. यादरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुकवरून लोकांशी भावनिक संवाद साधला होता आणि ‘वर्षा’ बंगला सोडून ‘मातोश्री’ वर दाखल झाले. त्यांनतर शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहले आहे. ज्यामध्ये, वर्षा बंगल्याची दारे ख-या अर्थाने सर्वांसाठी खुली झाली आहेत, असे म्हणत आमदारांनी पत्रात अनेक मुद्दे मांडले आहेत.

काल अचानक वर्षावर झालेली गर्दी बघून आनंद झाला. गेल्या अडीच वर्षात आमदारांसाठी ही दार कधीच उघडली नाहीत. त्यावेळी अनेकदा तासनतास आमदारांना वर्षाच्या गेटवर मुख्यमंत्र्यांची वाट बघायला लागायची. गेल्या अडीच वर्षात आमदारांना अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. मुख्यमंत्री कधी मंत्रालयात आले नाहीत, अशीही तक्रार या पत्रातून करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अनेकदा विनवण्या कराव्या लागायच्या. तीन चार लाख लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना अपमानास्पद वागणूक का? असा सवालही आमदारांनी केला आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

अफगाणिस्तानच्या कठीण काळात भारत त्यांच्या पाठीशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार जर्मनी, युएई दौऱ्यावर

शिवसेनेकडे उरले फक्त १४ आमदार

हिंदुत्व, अयोध्या, राम मंदिर हे सर्व मुद्दे शिसेनेचे आहेत. मग जेव्हा आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्याला गेले तेव्हा आमदारांना जाऊन दिलं नाही. स्वतःच्या आमदारांना मुख्यमंत्री भेटले नाही. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना मुख्यमंत्री नियमित भेटायचे. सोशल मीडियावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे भूमिपूजन, अनेक कामांचे फोटो टाकायचे. मग शिवसैनिक शिवसेनेच्या आमदारांना प्रश्न करायचे त्यांना निधी मिळतो मग स्वतःच्या आमदारांना का नाही? असे सवाल त्यांनी पत्रातून केले आहेत. यासह अनेक मुद्यांवर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केले आहेत.

Exit mobile version