कुडाळ-मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाकडून चौकशी करण्यात आली आहे. एसीबीने तब्बल अर्धा तास नाईक यांची चौकशी केल्यानंतर त्यांना २० वर्षांतील उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
कुडाळ- मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची शुक्रवार, ७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्या कडून चौकशी करण्यात आली. यावेळी एसीबीने वैभव नाईक यांना २००२ ते २०२२ या कालावधीतील उत्पनाबद्दल विचारण्यात आले. तसेच त्याचा तपशील देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. एसीबीने त्यांना आठ दिवसांत सर्व माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
लाचलूचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाकडून वैभव नाईक यांची चौकशी करण्यात आली. तर १२ ऑक्टोबरला पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भात वैभव नाईक यांना पत्र देण्यात आले आहे. कणकवलीत शासकीय विश्रामगृहावर वैभव नाईक यांची चौकशी करण्यात आली.
हे ही वाचा:
परतीच्या पावसाची राज्यासह मुंबईत दमदार हजेरी, मुंबईला येलो अलर्ट जारी
बसला आग लागून दहा जणांचा मृत्यू, सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार
मेस्सी म्हणतो हा माझा शेवटचा विश्वचषक
या संदर्भात वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपावर टीका केली आहे. “गृहखात भाजपाकडे असल्याने भाजपा दबाव तंत्र वापरत आहे. गेली अनेक वर्षे राजकारण, समाजकारण आणि व्यावसायात आहे. आतापर्यंत अशी चौकशी झाली नाही. मात्र, अशा प्रकारे कितीही चौकशी करा, या पद्धतीच्या दबाव तंत्राला भीक घालणार नाही,” असं वैभव नाईक म्हणाले.