27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाभाजपच्या कार्यक्रमाला गेले म्हणून शिवसेना आमदाराने मारले भावजयीला

भाजपच्या कार्यक्रमाला गेले म्हणून शिवसेना आमदाराने मारले भावजयीला

Google News Follow

Related

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याच्या कारणावरून शिवसेना आमदाराकडून बेदम मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याप्रकरणी वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यासह दहा जणांविरुद्ध त्या महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मारण्यात आलेली महिला ही आमदाराची सख्खी चुलत वैहिनी आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरातील गोदावरी कॉलनीत ही घटना घडली. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक लोकप्रतिनिधी अडचणीत आला आहे.

नेमके काय घडले?

सटाना येथील जयश्री बोरनारे व दिलीप बोरनारे हे पती-पत्नी शुक्रवारी वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी दुपारी शहरातील गोदावरी कॉलनीत आले होते. त्यावेळी दिलीप यांचे चुलतभाऊ आमदार रमेश बोरनारे आणि त्यांच्या पत्नी संगीता बोरनारे यांच्यासह इतर आठ लोकांनी मिळून जयश्री व दिलीप यांना घरातून बाहेर बोलावून तुम्ही भाजपच्या कार्यक्रमात जाऊन आमची बदनामी करत आहात, असे म्हणत मारहाण करण्यास सुरवात केली. वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमात अचानक आमदार व त्यांचे भाऊ महिलेला मारहाण करत असल्याचे बघून घटनास्थळी मोठी गर्दी जमली. जमलेले पाहुणे देखील अचंबित झाले. यानंतर पिडीत पती-पत्नीने थेट वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा

पत्रकार रवीश तिवारी कालवश

‘दिशा सालियनचा पोस्टमॉर्टेम अहवाल कुठे आहे? डॉक्टरांना कुणी दम दिला’

शिवनेरीवर बाळ शिवबासाठी पाळणा जोजवला

मात्र शिवसेना आमदाराने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्या घरगुती वादातून हा प्रकार घडला आहे, याला कोणतेही राजकीय वळण देऊ नये असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, आमदार बोरनारे आणि त्यांच्या पत्नीसह १० जणांविरोधात शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी कैलास प्रजापती करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा