31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणयुवराजांची 'दिशा' चुकली

युवराजांची ‘दिशा’ चुकली

युवराजांची कायमच दिशा चुकली असे म्हणत सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे. विशेष म्हणजे त्या बॅनरवर 'दिशा' या शब्दाल बोल्ड केलं आहे.

Google News Follow

Related

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. काल सत्ताधाऱ्यांनी कोविडच्या भितीने राजा बसला घरी…अशी घोषणाबाजी करत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तर आज, २५ ऑगस्ट रोजी सत्ताधाऱ्यांनी युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. युवराजांची दिशा चुकली, अशा प्रकारच्या घोषणा देत आदित्य ठाकरेंच्या व्यंगचित्राचे बॅनर हातात घेऊन सत्ताधारी पायऱ्यांवर उभे होते.

आदित्य ठाकरेंवर शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार आणि भाजपा आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. युवराजांची कायमच दिशा चुकली असे म्हणत सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे. विशेष म्हणजे त्या बॅनरवर ‘दिशा’ या शब्दाल बोल्ड केलं आहे. या पोस्टरमध्ये ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (प पू) युवराज’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

त्या बॅनरवर आदित्य ठाकरेंना घोड्यावर उलट्या दिशेने तोंड करुन बसलेलं दाखवण्यात आलेलं असून, हिंदुत्वाऐवजी महाविकास आघाडीकडे प्रवास करत असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्या हट्ट कसा आहे हेही या बॅनरमधून सांगण्यात आलं आहे. २०१४ ला १५१ चा हट्ट धरून त्यांनी युती बुडवली. २०१९ ला खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा त्यांनी पायदळी तुडवली असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच घरात बसून त्यांनी पर्यटन खातं चालवलं आणि सत्ता गेल्यावर त्यांना पर्यटनाची लहर आली अशी टीका केली आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांनी आदित्य ठाकरेंच बॅनर गळ्यात घालून उभे होते.

हे ही वाचा:

‘आता महामार्गावर टोलनाक्यांऐवजी कॅमेरे बसवले जाणार’

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांना ईडीकडून अटक

एरंगल गावातील बेकायदा स्टुडिओ प्रकरणाची होणार सखोल चौकशी

सोनाली फोगाट यांची हत्या झाल्याचा दावा

यापूर्वी चार दिवस विरोधक पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. मात्र, काल आणि आजपासून चित्र पालटले आणि विरोधकांच्या जागी सत्ताधारी घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा