डोंबिवलीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

डोंबिवलीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड पुकारल्यामुळे, शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यातच आता शिवसेनेतील दहाहुन अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

डोंबिवली शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेच्या १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे डोंबिवली शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. राजीनामे दिलेले सर्व पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याचे मानले जात आहे.

शिवसेना शाखेतील एकनाथ शिंदे यांची छायाचित्रे महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हटवली होती, ही माहिती मिळताच शिंदे समर्थक उपजिल्हाप्रमुख राजेश कदम कार्यकर्त्यांसह शिवसेना शाखेत आले होते. त्यांना कार्यकर्त्यांनी रोखले. त्यावरुन शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. ज्या शाखेत निष्ठेने तीस वर्षे शिवसैनिक म्हणून वावरलो त्याच शाखेत प्रवेश मिळत नसेल तर शिवसैनिक म्हणून घेण्यात काय अर्थ असा सवाल करत १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

हे ही वाचा:

आम्ही उद्या मुंबईत येणार; कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

किशोरी पेडणेकरांना पून्हा त्याच नावाने धमकीचे पत्र

महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये भीषण आग

ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनीही राजीनामा दिला आहे. ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे.

Exit mobile version