एकनाथ शिंदेंचे ‘शिवसेनाभवन’ दादरमध्येच

उद्धव ठाकरे यांना झटका

एकनाथ शिंदेंचे ‘शिवसेनाभवन’ दादरमध्येच

शिवसेना काेणाची यावरून दावे- प्रतिदावे सुरू आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अजुनही संघर्षाच्या ठिणग्या उडत आहेत. पण आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दादरच्या शिवसेना भवना समाेरच आपले मुख्यालय सुरू करण्याचा इरादा जाहीर केल्याने या ठिणग्यांचा थेट भडका उडवून ठाकरे यांना माेठा धक्का दिला आहे. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दादरमध्येच आपले कार्यालय उभारून या कार्यालयातून एकनाथ शिंदे हे स्वत: जनतेच्या समस्या जाणून घेणार असल्याचं म्हटलं आहे.

दादरमधील शिवसेना भवन म्हणजे तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आहे. याच शिवसेना भवनात शिवसैनिकांबराेबरच सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या जात आणि साेडवल्याही जात हाेत्या. परंतु अलिकडच्या काही वर्षात हा धागा तुटल्यासारखा झाला हाेता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपले ऐकून घेत नाहीत अशा तक्रारी खुद्द शिवसेना आमदारांनी वारंवार केल्या हाेत्या. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला मदत करतात असा आराेप शिवसेनेच्या आमदारांनी केला हाेता. याच सगळ्या कुरबुरी आणि तक्रारीतून ४० आमदारांसह सत्तांतर घडले. त्यामुळे जनतेचा आवाज ऐकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची कर्मभूमी दादरमध्येच आपले कार्यालय उघडण्याचा विचार केला अशी चर्चा आहे. शिवसेना भवना समाेर एकनाथ शिंदे यांचे प्रति शिवसेना भवन उभे राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु सदा सरवणकर यांनी हे प्रतिसेना भवन नाही तर मुंबईकर नागरिकांच्या समस्या साेडवण्यासाठी हे कार्यालय उभारण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा:

‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी

धनुष्यबाणाच्या लढाईची कागदपत्रे सादर करा

उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला

परदेशात नोकरी लावतो सांगून ‘त्या’ गंडवत होत्या

जागेची चाचपणीही झाली

दादर परिसरात शिंदे गटाने जागेची चाचपणीही केली असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या प्रत्येक प्रभागामध्ये एक कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. हेच मुख्य कार्यालय असेल. नागरिकांच्या समस्या साेडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून १५ दिवसांत कार्यालय सुरू हाेईल असे सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version