राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज मुंबईत होणार आहे.यावेळी महाविकास आघाडीतील नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला शिवसेना उबाठा गटाचे नेते प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.तसेच उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का?, असा सवाल उपस्थित करत खोचक टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटकरत लिहिले की, शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता.याच शिवतीर्थावरून हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री केजरीवाल यांना नवीन प्रकरणात ईडीकडून समन्स!
कोलकाता: तोतया लष्कर अधिकारी पोलिसांच्या ताब्यात!
राज्यांची कामगिरी आणि भाजपचे यश
ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी शाहजहान शेखच्या भावाला अटक
शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता.
याच शिवतीर्थावरून हिंदुहृदय सम्राट वंदनीय… pic.twitter.com/2Ye71yOJTF
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 17, 2024
‘‘शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन,‘‘ असे रोखठोक बजावणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही शिवतीर्थावर आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत नाहीत. तुम्ही का करीत नाहीत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस उद्धव ठाकरे दाखवणार का? वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न आहे.
आज ‘न्याय यात्रेची’ नाटक कंपनी घेऊन राहुल गांधी याच शिवतीर्थावर येणार आहेत. आता उद्धव ठाकरे याच शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? हाच प्रश्न आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे विसरले असतील तर काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते ते ऐकाच!, असे ट्विट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.