शिवसेना कार्यकर्त्यांची आमदार रवी राणांना शिवीगाळ

शिवसेना कार्यकर्त्यांची आमदार रवी राणांना शिवीगाळ

रविवारी, १७ एप्रिल रोजी आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अमरावतीतील शिवसेना कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांशी माध्यमांनी संपर्क साधला. त्यावेळी एका शिवसेना कार्यकर्त्यांने माध्यमांसमोर रवी राणा यांच्यावर शिवीगाळ केला आहे. तसेच, घोषणाबाजीतही रवी राणा यांच्यावर शिवसैनिकांनी अपशब्द वापरले आहेत.

शनिवारी, १६ एप्रिल रोजी देशात हनुमान जयंतीचा उत्सव पार पडला. त्यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांच्या दबावामुळे मुंबईत येऊ न शकल्याचे राणा यांनी स्पष्ट केले. त्यादरम्यान, शिवसेना कार्यकर्त्यांनी राणा यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांशी माध्यमांनी संवाद साधला. दरम्यान, एका शिवसेना कार्यकर्त्याने रवी राणा यांच्यावर थेट शिवीगाळ केला आहे. रवी राणाला जर मातोश्रीवर जायचं असेल तर आधी आमच्यासारख्या शिवसैनिकांना सामोरे जावे लागले, असे म्हणत रवी राणांवर सेनाकार्यकर्त्याने शिवीगाळ केला.

रविवारी राणा दाम्पत्य हे मुंबई दौऱ्यावर येणार असताना त्याआधीच शिवसेना कार्यकर्त्यांनी अमरावतीत आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. शिवसैनिक रवी राणा यांच्या निवासस्थानी निघाले असताना घोषणाबाजी करत आहेत. या घोषणाबाजीतही कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्याविरुद्ध अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या घराबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले १०८ फुटी हनुमान पुतळ्याचे उद्घाटन

INFOSYS ची छप्परफाड कमाई

माटुंगा येथील रेल्वे अपघाताचे कारण आले समोर

दिल्लीत शोभायात्रेत दिसल्या तलवारी

दरम्यान, रवी राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेना ही काँग्रेस सेना झाली असल्याची टीका केली आहे. आणि हे शिवसेना कार्यकर्ते माझ्या घरासोमर आंदोलन करण्यास आले आहेत, त्यावेळी त्यांसोबतच बसून मी हनुमान चालीसा पठण करेन, असा इशारा रवी राणांनी शिवसेना कार्यकर्त्यांना दिला आहे.

Exit mobile version