अपात्र आमदारांच्या मुद्यावरील सुनावणी संपली; सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला

सात सदस्यीय खंडपीठाकडे प्रकरण सोपविले जाणार का?

अपात्र आमदारांच्या मुद्यावरील सुनावणी संपली; सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला

महाराष्ट्रातील १६ अपात्र आमदारांच्या मुद्दायावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण सध्या सुरू आहे. पण सात सदस्यीय खंडपीठाकडे ते यावे अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे ते सात सदस्यीय खंडपीठाकडे जाणार का, याविषयी आता उत्सुकता आहे. तसे झाल्यास या प्रकरणाला आणखी विलंब होणार आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी तिसऱ्या दिवशीही युक्तिवाद केला. तर एकनाथ शिंदे गटाकडून प्रख्यात वकील हरीश साळवे, नीरज कौल व मणिंदर सिंग यांनी बाजू ठेवली.

या सुनावणीदरम्यान नबाम रेबिया, किहेतू, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक अशा विविध प्रकरणाचा दाखला देण्यात आला. हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे दिले पाहिजे, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. त्यावर मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे पाठवणे आवश्यक आहे का, असा सवाल उपस्थित केला होता. मात्र शिंदे गटाकडून त्याला उत्तर देण्यात आलेले नाही.

हे ही वाचा:

महाशिवरात्रीसाठी बेस्ट तर्फे विशेष बस सेवा

शिवजयंतीला घ्या शिवसृष्टीतील सरकारवाड्याचा अनुभव

सुकमामध्ये ३३ नक्षलवाद्यांनी खाली ठेवल्या बंदुका

इतकी कोटी झाली देशातील डिमॅट खातेदारांची संख्या

गेल्या आठ महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आधी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या सुनावण्या पार पडल्या. त्यानंतर आता पाच सदस्यी खंडपीठ यातले युक्तिवाद ऐकत आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत नेहमीच्या शैलीत म्हणाले की, आपण या सुनावणीकडे बारीक लक्ष ठेवले आहे. पण शिंदे गट या प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने येईल असे म्हणत आहे. हा विश्वास कशातून येतो आहे. लोकशाहीचा मुडदा कोण पाडू शकत नाही. न्याय मेलेला नाही. शिवसेना ठाकरे गटाचीच आहे हे सिद्ध होईल, त्यामुळे सुनावणीचा घोळ घालण्याची गरज काय?

Exit mobile version