27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणपार्किंगमुळे शिंदे गटाला सर्वाधिक पाठिंबा असल्याचे संकेत

पार्किंगमुळे शिंदे गटाला सर्वाधिक पाठिंबा असल्याचे संकेत

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटात जय्यत तयारी

Google News Follow

Related

मुंबईत यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहे आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात सर्वाधिक गर्दी कुठे असणार याची उत्सुकता सर्वानाच आहे. परंतु मुंबई पोलिसांच्या सर्वेनुसार शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात सर्वाधिक गर्दी होणार आहे, त्यानुसार वाहतूक विभागाने वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली असून सर्वाधिक पार्किंग व्यवस्था शिंदे गटाच्या वाहनांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाच्या वर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे भरविण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेळावा दादर शिवाजी पार्क येथे होणार आहे. मेळाव्यासाठी गर्दी खेचून आणण्यासाठी दोन्ही गटांकडून चुरस सुरू आहे. राज्यातील नागरिकांना देखील यंदाचा दसरा मेळाव्यात सर्वाधिक गर्दी कुणाच्या मेळाव्यात होणार आहे याची उत्सुकता लागलेली आहे.

परंतु पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार पोलीसानी केलेल्या सर्वे वरून यंदाच्या दसऱ्या मेळाव्यासाठी सर्वाधिक गर्दी ही शिंदे गटांकडून असेल असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई वाहतूक विभागाने मुंबईत पार्किंगची व्यवस्था केली आहे. वाहतूक विभागाने पार्किंगसाठी सर्वाधिक ठिकाणे शिंदे गटासाठी राखीव ठेवली आहे, शिंदे गटाच्या वाहनांसाठी एकूण २३ पार्किंगची ठिकाण असून ठाकरे गटासाठी केवळ १२ ठिकाणे राखीव ठेवण्यात आलेली आहेत.वाहतूक पोलिसांच्या या पार्किंग वरून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात सर्वाधिक गर्दी होणार असल्याचे कळते.

अशी असणार पार्किंग व्यवस्था :

दोन्ही गटासाठी वाहतूक पोलिसांकडून पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली कुठल्या गटाने कुठे आपली वाहने पार्क करावी याची माहिती देण्यात आली आहे.

शिंदे गटासाठी पार्किंग :

पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी वरळी सि. लिंक कडून मेळाव्यासाठी येणाऱ्यासाठी वाहन पार्किंग

बसेस साठी पार्किग व्यवस्था:

१) फॅमीली कोर्ट पाठीमागील बाजू व्हाया जेतवन बिल्डींग ते इन्कम टॅक्स जंक्शन पर्यतीची मोकळी जागा
२) कॅनरा बँकेजवळील एमएमआरडीए पे ॲन्ड पार्क कॅनरा बँक, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे पूर्व
३) पंजाब नॅशनल बँक समोरील मोकळे मैदान वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स
४)फटाका मैदान कॅनरा बँके समोरील मैदान (कनेक्टर सी / ३२, जी ब्लॉक, वांद्रे- कुर्ला कॉम्पलेक्स
५) एमएमआरडीए कार्यालय समोर, मागील मोकळी जागा,फॅमीली कोर्ट, वांद्रे- कुर्ला कॉम्पलेक्स
६)जिओ गार्डन जवळ एमएमआरडीए पे अॅन्ड पार्क आय एलएफएस बिल्डींग समोर, भारत नगर वांद्रे पूर्व

कार साठी पार्किंग व्यवस्था

१)जिओ गार्डन बेसमेंट पार्किंग वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स
नवी मुंबईकडून बिकेसी कनेक्टर ब्रिजमार्गे बिकेसी येथील वाहनांसाठी पार्किंग
बसेस साठी पार्किग व्यवस्था:
१) वुई वर्क इमारत शेजारील मोकळे मैदान
जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स, वांद्रे पूर्व,
२) ओएनजीसी बिल्डींगचे उजवे व डावीकडील गोकडे मैदान कॅनरा बँकेसमोरील मोकळे मैदान सी/६९. जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स
३) कॅनरा बँकेसमोर वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स,
४) सोमैय्या कॉलेज मैदान चुनाभट्टी

कार साठी पार्किंग व्यवस्था:

१)एम सी ए. बलब कार पार्किग,एम.सी.ए. वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स,
पश्चिम दृतगती मार्गाने कलीना मधून येणारी वाहने तसेच पूर्व दृतगती मागाने एससीएलआर मार्गे मेळाव्यामध्ये सहभागी लोकांना घेवून येणारे वाहने पार्किग करीता

बसेस साठी पार्किग व्यवस्था:

१) सीबीआय बिल्डींग शेजारील मोकळे मैदान
प्लॉट नं. सी / ३५ ए, जी ब्लॉक, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स
२)टाटा कम्युनिकेशन ते इन्कमटॅक्स क्वॉटर्स रोडपर्यंत पार्किग वांद्रे पूर्व
३)हॉटेल ट्रायडेंन्ट गॅप ते बीकेसी रोडपर्यंत पार्किग वांद्रे कुर्ला काम्पलेक्स
४)अंबानी सकुल शेजारील पे अॅन्ड पार्क पार्किग,
५)एमएमआरडीए पे अॅन्ड पार्क
६) एम.टी. एन. एल ते कनेक्टर जंक्शन एकेरी पार्किंग
७)युनिव्हर्सिटी गेट मधील मोकळा परिसर मुंबई विद्यापिठ, कालिगा, सांताक्रुझ पूर्व
८)जे. कुमार, ट्रेड सेंन्टर समोरील मोकळी जागा

कार पार्किंग :

१)डायमंड बोर्स बेसमेंट पार्किग
२)जिओ सेंटर पार्किग

कार्यक्रमस्थळी महत्वाचे आणि अती महत्वाचे यांचे वाहने पार्किग व्यवस्था:

१)जे.एस. डब्लू समोरील मोकळे मैदान
जे.एस. डब्लू इमारत,वांद्रे कुर्ला काम्पलेक्स,

ठाकरे गटासाठी पार्किंग व्यवस्था :

पश्चिम आणि उत्तर उपनगरे येथून पश्चिम द्रुतगती मार्गाने मेळाव्या साठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहने खालील ठिकाणी पार्क करतील.

बसेससाठी पार्किंग

१) सेनापती बापट मार्ग दादर पश्चिम
२) कामगार मैदान एल्फिन्स्टन रोड
३)इंडिया बुल फायनान्स
४) इंडिया बुल- १ सेटर
५) कोहिनुर स्केअर
ठाणे, नवी मुंबई येथून पुर्व द्रुतगती मार्गाने येणारे वाहन –

बसेससाठी पार्किंग

१) पाच गार्डन माटुंगा
२) नाथालाल पारेख मार्ग माटुंगा
३) एडनवाला रोड माटुंगा
४) आर. ए. के. रोड, वडाळा

वीर सावरकर रोड मार्गे दक्षिण मुंबई कडून मेळाव्यासाठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहने रविंद्र नाटय मंदिर येथे लोकांना उतरवून खालील ठिकाणी पार्क करतील.

बस पार्किंग :

१) आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई

कार पार्किंग:

१) इंडियाबुल इंटरनॅशनल सेंटरसेनापती बापट मार्ग, एलफिन्सटन (प)
२)इंडिया बुल १ सेंटर ज्युपिटर मिल कंम्पा. सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन (प)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा