“शिंदे गट’ नाही आता “शिवसेना” म्हणा..

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून हे निवेदन प्रसिद्ध

“शिंदे गट’ नाही आता “शिवसेना” म्हणा..

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हअधिकृतपणे दिले आहे. त्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाने प्रसिद्धी पत्रक जारी करून माध्यमांनी आता आम्हाला शिंदे गट नव्हे तर ‘शिवसेना’ असे संबोधावे असे म्हटले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पक्षात ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. अशा स्थितीत पक्षावर दावा करण्यासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांकडून याचिका दाखल करण्यात आली होती. आम्हीच मूळ शिवसेना पक्ष असल्याचा दावा ठाकरे गटाने केला होता. तर दुसरीकडे शिंदे गटानेही शिवसेना पक्षावर दावा करत आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगितले. त्यामुळे हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले. ऑगस्टपासून हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होते.

सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही निर्णय येत नव्हता. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र याच दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. त्यामुळे निवडणूक आयोगानेही सुनावणी सुरू केली होती. दोन्ही गटांची बाजू ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतीक्षा असतानाच १७ फेब्रुवारीला सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने दिले .

हे ही वाचा:

या २० देशांतील नागरिक करू शकतील भारतात UPI द्वारे व्यवहार.. जाणून घ्या तपशील

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ.. हेरगिरी प्रकरणी खटला चालवण्यास मंजुरी

एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज!

निवडणूक आयोगाने शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर केले. शिंदे गटाकडे सर्वाधिक आमदार आणि खासदार असल्याने खरी शिवसेना हीच शिंदे गट असल्याचा निष्कर्ष निवडणूक आयोगाने काढला. त्याचवेळी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्राद्वारे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी माध्यमांना शिंदे गटाऐवजी शिवसेना म्हणण्याची विनंती केली आहे.

Exit mobile version