राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले आणि राज्यात कामांना वेग आला. शिंदे फडणवीस सरकार येताच मेट्रो 3 कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरे कारशेडवरील बंदी उठवली आहे. तांत्रिक बाब पूर्ण झाल्यामुळे आता कारशेडचं काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आरेमध्ये कारशेड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात निर्णय झाला होता. मात्र, यावर महाविकास आघाडीने स्थगिती आणली होती. तसेच, हे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती. मात्र ही स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हटवली आहे. त्यामुळे आता कारशेड आरेमध्येच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तब्बल अडीच वर्ष स्थगित असलेल्या कारशेडचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
हे ही वाचा:
व्हायरल व्हिडिओमध्ये नाना? चित्रा वाघ यांच्या ट्विटवर कारवाईचा इशारा
आता ६० देशात विनाअडचण प्रवास करा!
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार
महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी
शिवसेना भाजपा युती सरकारच्या काळात मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचे २५ टक्के कामही पूर्ण झाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली. आरेऐवजी कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता. मात्र, या जागेच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद उच्च न्यायालयात गेला आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे आरे कारशेडचे काम रखडले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कारशेड आरेतच घेण्याचा निर्णय घेतला आणि कारशेडवरील बंदी देखील उठवली आहे.