पत्रकार वारिसेंच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत

मुलाला नोकरी राज्य  सरकारची  मोठी घोषणा

पत्रकार वारिसेंच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत

पत्रकार शशिकांत वारीसे याचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी विशेषतः उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. आता या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी  चौकशी करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज वारीसे कुटुंबाला राज्य सरकारने २५ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.

पत्रकार वारीसे यांचा संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर सध्या पोलीस कोठडीत आहे. वारिसें यांचे कुटुंबीय कोलमडून पडले आहे. त्यांच्या कुटुंबाची व्यथा सर्व माध्यमांनी लावून धरत कुटुंबाला मदत करण्याच्या मागणीने जोर धरला. राज्य सरकारने आज वारीसे  कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली तर शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या मुलाला यश याला कायमस्वरूपी नोकरी देण्यात येईल अशी ग्वाही रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा

सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

राजापूर येथील पत्रकार वारीसे यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यां    मुलगा आणि त्याच्या आजीवर खूपच दुःखद प्रसंग ओढवला. या कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी पत्रकार संघाने केली होती, हि मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केल्यावर त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाखाची मागणी तर १५ लाख इतर माध्यमातून अशी एकूण २५ लाख रुपयांची मदत वारीसे  यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. त्याशिवाय वारीस यांच्या मुलाला नोकरी देण्याचे आश्वासन सुद्धा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळेस केले.

 

Exit mobile version