दक्षिण कोरियाच्या राजदूतांकडून कौतुक
भारत हा लसींच्या बाबतीत खूप पुढारलेला आहे आणि भारताने आपली स्वतःची लसही निर्माण केली, अशा शब्दांत दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत शिन बाँग किल यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त असताना आमचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान मोदी यांनी आपले संबंध अधिक दृढ केले.
शिन यांनी भारताने आपल्या शेजारी राष्ट्रांना लसी पुरवून केलेल्या मदतीचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारताने स्वतःची एक वेगळी प्रतिमा यामधून तयार केली. आपल्या शेजारी देशांना लसी पुरविणे ही एक नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. जर भारताने त्यांना मदत केली नसती तर त्यांना आणखी कोण मदत करू शकले असते? भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालदिवज आणि इतर देशांना भारताकडूनच मदतीची अपेक्षा होती. आपण सर्वांनीच एकमेकांना मदत करायला हवी.
हे ही वाचा:
शिवसेनेने दाखवली औरंगजेबी वृत्ती
राम मंदिर उभारणीत कोलदांडा घालणाऱ्या शिवसेनेला ‘फटकार’
खोट्या ट्विट्ससाठी काँग्रेस नेते, पत्रकार आणि ट्विटर विरोधात गुन्हा
ट्वीटरने कायदेशीर संरक्षण गमावलं, केंद्र सरकारची कारवाई
शिन यांनी सांगितले की, जर एखाद्याने कोव्हिशिल्ड घेतले असेल तर त्याला दक्षिण कोरियात सक्तीने विलगीकरणात राहण्याची गरज नाही. पण कोव्हॅक्सिन घेतले असेल तर त्याला दोन आठवडे विलगीकरणात राहावे लागेल. पण हे निर्बंध सर्वसामान्य व्यक्तींसाठी आहेत. महत्त्वाच्या किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हे निर्बंध नसतील. शिन यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिन घेतल्याचे आम्ही पाहिले. जर पंतप्रधान मोदी कोरियाच्या दौऱ्यावर आले तर त्यांना असे विलगीकरणात राहावे लागणार नाही. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हे निर्बंध नाहीत. उद्या लष्करप्रमुख कोरियाच्या दौऱ्यावर आले तर त्यांना या निर्बंधांचा सामना करावा लागणार नाही.
शिवाय, शिन यांनी असेही सांगितले की, जे कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतील त्यांना कोरियात विलगीकरणात राहण्याची गरज नाही. पण कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांना मात्र दोन आठवडे विलगीकरणात राहावे लागेल.