हायड्रोजन सोडा, मलिकांना ऑक्सिजनची गरज!

हायड्रोजन सोडा, मलिकांना ऑक्सिजनची गरज!

आशीष शेलार यांचा घणाघात

हायड्रोजन बॉम्ब लावणारे मलिक तर लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत. हतबलता घालमेल इतकी होती की, हायड्रोजन सोडा त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल अशी परिस्थिती आहे, अशी खरमरीत टीका भाजपाचे नेते आमदार ऍड. आशीष शेलार यांनी केली.

नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर शेलार यांनी मलिक यांच्यावर हल्लाबोल केला. शेलार म्हणाले की, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे असे वेगवेगळे मुद्दे घेत खूप मोठे चित्र उभे करण्याचा प्रयत्न मलिक यांनी केला पण तो विफल ठरला.

हा सगळा संबंध जोडणे म्हणजे अकबर बिरबलाच्या गोष्टीत बिरबलाने जमिनीपासून उंचावर बिर्याणीचे भांडे ठेवून ते तापविण्याचा प्रयत्न केला तसाच मलिकांचा प्रयत्न होता. शेलार यांनी सांगितल की, मलिकांच्या आरोपांत काहीच तथ्य नाही. राज्य सरकारची यंत्रणा तीन पक्ष एकत्र येऊन सुद्धा फडणवीसांवर चिकटणारा आरोप ते करू शकले नाहीत. खरे आहे की, मुन्ना यादव, अराफत हाजी हैदर हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. अराफत आणि हैदर यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची चौकशी केल्यावर कायदेशीर नेमणुका झाल्या आहेत. यादव यांच्यावर एक आरोप आहे. त्याचे स्पष्टीकरण मुन्ना यादव करतील. ते स्वत: राष्ट्रवादीचे कनेक्शन सांगतील.

 

हे ही वाचा:

सदाभाऊ खोतांना मानखुर्द जवळ रोखले

फडणवीस कोणाला म्हणाले डुक्कर?

‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात चार जण अटकेत

 

शेलार यांनी सांगितले की, गेले दोन वर्ष तर मलिक तुमचे सरकार आहे. विशेषतः तुमच्या पक्षाकडे गृहमंत्रीपद आहे. हाजी हैदर याच्यावर गेल्या दोन वर्षात अदखलपात्र गुन्हाही नोंद करू शकला नाहीत. इम्रान आलम शेख हा हाजी अराफतचा भाऊ होता तो काँग्रेसचा तत्कालिन सचिव होता. जेव्हा आरोप झाला तेव्हा तो काँग्रेसचा सचिव होता आणि आता तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. सामान्य माणसांना अडकविण्याचा राष्ट्रवादीचा धंदा आहे. आरोप कर आणि पळून जा, असा विफल प्रयत्न मलिकांनी केला.

Exit mobile version