भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी न्यूज २४ वर झालेल्या पॅनेल चर्चेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांची चांगलीच पोलखोल केली.
सध्या देशभरात चर्चेत असलेल्या हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून ही चर्चा घेण्यात आली होती. त्यात भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला, शिवसेनेच्या शीतल म्हात्रे, राष्ट्रवादीचे निलेश भोसले सहभागी झाले होते. त्यावेळी शहजाद पूनावाला यांनी हनुमान चालिसा म्हणून दाखवावी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी आव्हान दिले. त्यावर शहजाद यांनी हनुमान चालिसाच्या दोन ओळी म्हणून दाखविल्या.
त्यानंतर पूनावाला यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना पुढील चार ओळी म्हणण्याची विनंती केली. पण शीतल म्हात्रे यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही सांगाल तसे आम्ही म्हणायचे का, असा पवित्रा त्यांनी घेतला. पण पूनावाला यांना मात्र म्हात्रे यांनी हनुमान चालिसा म्हणून दाखविण्याचे आव्हान दिले होते. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते निलेश भोसले यांना हनुमान चालिसा म्हणून दाखविण्यास पूनावाला यांनी सांगितले. तेव्हा भोसले उखडले. आपला धर्म आपल्या घरात ठेवायचा असतो अशी गोलमोल उत्तरे ते देऊ लागले. तेव्हा या चर्चेचे सूत्रसंचालक मानक गुप्ता यांनी म्हटले की, दोन्ही प्रवक्त्यांनी दिलेल्या आव्हानाप्रमाणे पूनावाला यांनी हनुमानचालिसा म्हणून दाखविली मग आता त्यांना ती का म्हणता येत नाही. पण त्या दोघांनीही टाळाटाळ केली.
हे ही वाचा:
महाविकास आघाडीला पुन्हा फटका, पवई सायकल ट्रॅकला मनाई
१५ मे रोजी धडाडणार देवेंद्र फडणवीसांची तोफ
दिल्ली, पंजाब, हरयाणा पोलिसांच्या तावडीत सापडले भाजपा प्रवक्ते ताजिंदर बग्गा
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तीन मराठी सिनेमांची वर्णी
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणानंतर मशिदींवरचे भोंगे उतरविले नाही तर आम्ही मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमानचालिसा म्हणू असे आव्हान दिल्यानंतर हनुमान चालिसा हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यावरूनच या चर्चेचे आयोजन या वाहिनीवर करण्यात आले होते.