‘इनकी जी-२० समिट’ या वक्तव्याबद्दल प्रियांका वड्रांवर शेहजाद पूनावालांची टीका

जी-२० परिषदेच्या आयोजनावरून विरोधकांना उठला पोटशूळ

‘इनकी जी-२० समिट’ या वक्तव्याबद्दल प्रियांका वड्रांवर शेहजाद पूनावालांची टीका

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी राजस्थानमध्ये भाषण देताना ‘जी २० परिषदे’चा उल्लेख ‘ इनकी जी-२० समिट (त्यांची जी २० परिषद’ अर्भात भाजपची) असा केल्याने भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. ती ‘भारताची जी २० परिषद’ होती, याची आठवण भाजपने करून दिली आहे.

 

नवी दिल्लीमध्ये नुकतीच दोन दिवसीय ‘जी २० शिखर परिषद’ यशस्वीपणे पार पडली. मात्र राजस्थानमध्ये भाषण करताना प्रियंका गांधी यांनी ‘या सकाळी मी पाहिले की, पावसामुळे त्यांची ‘जी २० परिषदे’ची ठिकाणे जलमय झाली होती.’ काँग्रेसनेत्या वड्रा यांनी ‘त्यांची’ म्हणजे ‘भाजपची’ अशा अर्थाने उल्लेख केला. ‘ही दैवाने केलेलीच जणू कृती होती. देवाला भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला दाखवून द्यायचे होते की, गर्व करू नका. देशभरातील नागरिक जे भीतीपोटी सांगू शकले नाहीत, ते देवाने करून दाखवले. गर्व करू नका, असे ईश्वर सांगत आहे. या देशाने तुम्हाला नेता बनवले आहे. देश आणि जनतेलाच प्राधान्य द्या,’ असे प्रियांका गांधी वड्रा राजस्थानमधील रॅलीत म्हणाल्या.

हे ही वाचा:

सत्तेत बसलेले लबाड, बेईमान नाहीत; संभाजी भिडेंनी जरांगे पाटलांना दिला विश्वास

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार; तीन अधिकाऱ्यांचे निलंबन

पवार कुणबी व्हायला तयार आहेत का?

‘जवान’ चित्रपट पाहताना अनुपम खेर यांनी मारल्या शिट्ट्या

 

या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. अशा प्रकारे ‘यांची’, ‘त्यांची’ अशा प्रकारे शिखर परिषदेचा उल्लेख करणे योग्य आहे का? ही भारताने आयोजित केलेली ‘जी २० शिखर परिषद’ होती, याची आठवण त्यांनी करून दिली. ‘या त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या कुटुंबाची मानसिकताच अधोरेखित झाली आहे. जे देशाचे आहे, ते त्यांच्या परिवाराच्या मालकीचे आहे. असेच त्यांचे कुटुंब मानत आले आहे,’ असेही त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे.

Exit mobile version