शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल

ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आरोप करत गुन्हा दाखल

शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा रॅलीमधील व्हिडिओ मॉर्फ करत तो व्हायरल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून त्याबाबत त्यांनी दहिसर पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली आहे. आपला खोटा व्हिडिओ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱयांनी आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीच हा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे मध्यरात्री आपल्या कार्यकर्त्यांसह दहिसर पोलीस स्थानकात पोचून त्यांनी स्वतःचा आणि प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ अश्लील संदेश लिहून तो व्हिडिओ व्हायरल करण्यांत आला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

शुक्रवारी झालेल्या रॅली मधला हा व्हिडिओ असून तोच व्हिडिओ एडिट करून अश्लील करण्यात आला आहे. फेसबुकवरील मातोश्री नावाचे एक पेज आहे त्याच पेजवरून ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हाच मॉर्फ व्हिडिओ अपलोड करून व्हायरल केल्याचा आरोप म्हात्रेंनी केला आहे. म्हणून शीतल म्हात्रे आणि सुर्वे समर्थकांनी दहिसर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

६२ वर्षे झाली, आता ऑस्करविजेते रेड कार्पेटवरून चालणार नाहीत

तूर्त तरी ध्रुव हेलिकॉप्टरची घरघर थांबली.. जाणून घ्या कारण

रायगडावर जात आहात, पण रोपवे बंद आहे!

‘त्या’ जोडप्याचा भांग पिऊन बाथरुममध्ये झाला मृत्यू

शीतल म्हात्रे काय म्हणाल्या?

आज मी कोणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे. विरोधकांच्या घरात सुद्धा महिला आहेतच ना. हा इतक्या खालच्या थराचा खोटा व्हिडिओ टाकणे, अश्लील संदेश टाकणे हे किती वाईट आहे. विरोधक एखाद्या महिलेच्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे दिसत आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे म्हणुनच त्याच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात म्हात्रे यांनी आपल्या सोशल मेडियावरून पण आपले मत मांडले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसेल तर तिचे चारित्र्य हनन करणे हेच उद्धव गटाचे संस्कार आहेत. मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवरून एका स्त्री संदर्भात मॉर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?

Exit mobile version