काँग्रेसला धक्का देत शत्रुघ्न सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल

काँग्रेसला धक्का देत शत्रुघ्न सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल

बिहारी बाबू म्हणून ओळख असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आता पश्चिम बंगालच्या राजकारणात पाऊल टाकलं आहे. आधी भारतीय जनता पार्टी, नंतर काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर सिन्हा लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ट्विटमध्ये ममता बॅनर्जी यांच्या निमंत्रणावरून मी टीएमसीमध्ये सामील झाल्याचे सिन्हा यांनी ट्विटरवर सांगितले आहे.

सिन्हा यांना तृणमूल काँग्रेसकडून बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं तिकीट जाहीर झालं आहे. हे ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून सांगितले आहे. गायक व माजी खासदार बाबूल सुप्रियो यांच्या राजीनाम्यामुळे आसनसोल मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.

सिन्हा यांनी चाळीस वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याकाळात सिन्हा हे पक्षामध्ये स्टार प्रचारक म्हणून सक्रीय होते. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात त्यांनी अनेक वर्ष हे काम केलं आहे. सिन्हा हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनतर त्यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते सक्रीय राजकरणातून बाजूला झाले होते. मागील वर्षी जुलै महिन्यात ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होणार होते. पण त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला नव्हता. आता ममतांनी त्यांना थेट लोकसभेच्या मैदानात उतरवत काँग्रेसला धक्का दिला आहे.

हे ही वाचा:

डेरवण युथ गेम्स : ‘अपयशातूनच होते यशाची निर्मिती’

पर्यावरणासाठी उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘विवेकानंद सस्टेनेबिलिटी पुरस्कार’

पंतप्रधान मोदी म्हणतात की, काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनत राहिले पाहिजेत!

‘या’ कारणासाठी मालदीवने मानले भारताचे आभार!

निवडणूक आयोगाने शनिवारी बंगालसाठी लोकसभा व विधानसभेच्या काही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. बंगालमधील एक लोकसभा व चार विधानसभा मतदारसंघासाठी १२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे

Exit mobile version