पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांवर सर्वांचेच लक्ष होते. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे, तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले आहेत.
जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला असून विरोधात उभे असलेले तर ज्ञानदेव रांजणे यांचा विजय झाला आहे. पाटण विकास सेवा सोसायटी गटात शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले आहेत. कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला आहे.
हे ही वाचा:
ईडी म्हणते, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांना मुलाची साथ
पेंग्विन पुन्हा ‘हाय- वे’च्याच हवाली!
खड्ड्यांमुळे रायफलमधून गोळी सुटली आणि जवानाचा गेला प्राण
पवार-परब बैठकीत साडेचार तास फक्त चर्चा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ९६ टक्के मतदान करण्यात आले होते. २१ जागांसाठी ही लढत असताना यातील ११ जागा या बिनविरोध होत्या. तरीही उर्वरीत १० जागांसाठी झालेल्या मतदानानंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आणि या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले असून त्यांनी थेट पक्ष कार्यालयावरच हल्ला चढवला आहे. कार्यालयावर त्यांनी दगडफेक करत आपला संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वामुळेच शिंदे यांचा पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.