सातारा बँक निवडणुकीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे भलतेच नाराज झाले आहेत. या पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार आहेत, असा आरोप करत त्यांनी आपल्या पराभवामागे घाणेरडे राजकारण झाल्याचे म्हटले आहे.
या निवडणुकीनंतर त्यांनी माध्यमांना सांगितले की, या निवडणुकीत १०० टक्के राजकारण झाले. काही लोकांना पाडण्यासंदर्भातील निर्णय १०० टक्के झाला. जिल्ह्यातील काही लोकांचीही त्याला मदत मिळाली. अशी चर्चा आहे. पक्षाच्या व शरद पवारांच्या चौकटीबाहेर जाऊन मी काम करणार नाही. पण हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा. शशिकांत शिंदे पडला त्याला शिवेंद्रराजे जबाबदार आहे, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. यामागे मोठे षडयंत्र आहे. पाच वर्षे काम करूनही हार पत्करावी लागते हे कळू नये इतका मी दुधखुळा नाही.
शशिकांत शिंदे म्हणाले की, मी पराभूत झाल्यावर काही जण आनंदाने नाचले. यावरून पराभवामागील सूत्रधार कोण ते स्पष्ट झाले. या निवडणुकीत उदयनराजे यांच्या जागेसंदर्भात बरीच चर्चा सुरू होती मात्र त्यांना बिनविरोध निवडून आणले गेले.
हे ही वाचा:
अमेरिकेतही दुमदुमला रा.स्व.संघाचा घोष
‘महाराष्ट्र बंद’ करणाऱ्या मविआने ३ हजार कोटीची भरपाई द्यावी!
स्वीडनला मिळाल्या पहिल्या महिला पंतप्रधान! पण काही तासांतच दिला राजीनामा
वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही! नवाब मलिक मुंबई उच्च न्यायालयासमोर नमले
या बँकेची निवडणूक झाल्यावर त्यात शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. पण नंतर शरद पवार यांनी त्यांना बोलावून घेतले होते. त्यानंतर बोलताना पवारांनी ही निवडणूक शशिकांत शिंदे यांनी गांभीर्याने घ्यायला हवी होती, अशी टिप्पणी केली होती.