भारतात दोन दिवसीय जी- २० शिखर परिषद पार पडली असून काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही या परिषदेचे कौतुक केले आहे. एकीकडे काँग्रेस टीका करत असताना थरूर यांनी कौतुक केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. विरोधकांकडून जी- २० संदर्भात टीका-टिप्पणी सुरू असून काँग्रेसकडूनही केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मात्र या परिषदेतून साध्य झालेल्या गोष्टींबद्दल मोदी सरकारची स्तुती केली आहे.
शशी थरूर हे ‘इंडियन एक्स्प्रेस’शी मुलाखातीत बोलत असताना त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. शशी थरूर म्हणाले की, “जी- २० परिषदेतून जे साध्य केलं आहे, ते नक्कीच भारतासाठी मोठं राजनैतिक यश आहे, असं म्हणता येईल. हे सर्व नेते भारतात येईपर्यंत याचीच शंका होती की, त्यांचे संयुक्त निवेदन तरी निघू शकेल की नाही. रशिया- युक्रेन युद्धाचे समर्थन करणारे आणि त्याला विरोध करणाऱ्यांमध्ये एकमत होणं निव्वळ अशक्य वाटत होतं. पण या मुद्द्यावर गेल्या ९ महिन्यांत अशक्य वाटणारा फॉर्म्युला प्रत्यक्षात मंजूर करून घेण्यात मोदी सरकारला यश आले आहे. हे भारताचं यश म्हणता येईल,” अशी स्पष्ट भूमिका शशी थरूर यांनी मांडली.
#WATCH | On G-20 Summit, Congress MP Shashi Tharoor says, "I'm in touch with both Amitabh Kant, the G-20 Sherpa, and with our foreign minister, and I would congratulate them because what they have done is certainly very, very good for India. It is not easy to pull off a… pic.twitter.com/9DavRq7FUe
— ANI (@ANI) September 10, 2023
दरम्यान, शशी थरूर यांनी जी- २० परिषदेसाठीचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत आणि देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे. आपण या दोघांशी बोलत असून त्यांचे अभिनंदन करत आहे. कारण, या दोघांनी जे केलं आहेते भारतासाठी निश्चितच खूप चांगलं आहे. अशा प्रकारची राजनैतिक चर्चा घडवून आणणं हे सोपं काम नाही. त्या दोघांनी यासाठी खूप कष्ट घेतल्याचं दिसून आलं, असं म्हणत शशी थरूर यांनी दोघांचेही कौतुक केले.
हे ही वाचा:
भारतातील जी- २० मध्ये विक्रमी कामगिरी; ११२ प्रस्ताव संमत
‘भारताने जी २० अजेंड्यांचे युक्रेनिकरण होऊ दिले नाही’
जोकोव्हिचची विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅमला गवसणी
कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या !
या आयोजनात दिल्लीच्या सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. सरकारची जबाबदारी गरिबी हटवण्याची आहे, गरीबांना दृष्टीआड करण्याची नाही, असंही शशी थरूर म्हणाले. तसेच परिषदेसाठी विरोधी पक्षांना आमंत्रण न दिल्याचा मुद्दाही शशी थरूर यांनी उपस्थित केला. त्यामुळे परिषदेत राजनैतिक पातळीवर जी सर्वसमावेशकता दिसली, ती आपल्या अंतर्गत राजकीय पातळीवर मात्र दिसून आली नाही असं शशी थरूर म्हणाले.