शशी थरूर म्हणाले, हमास हे दशहतवादी संघटन; डावे खवळले!

मुस्लिम संघटनेच्या सभेत केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झाला नवा वाद

शशी थरूर म्हणाले, हमास हे दशहतवादी संघटन; डावे खवळले!

काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर हे विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता इस्रायल-हमास यांच्यातील संघर्षाबद्दल त्यांनी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या एका सभेत बोलताना शशि थरूर यांनी हमासच्या हल्लेखोरांना दहशतवादी म्हटले. ही सभा पॅलेस्टाइनला पाठिंबा दर्शविण्यासाठी घेण्यात आली होती.

 

एकीकडे भारताने इस्रायलची बाजू घेतली आहे तसेच पॅलेस्टाइनच्या सार्वभौमत्वालाही पाठिंबा दिला आहे. मात्र हमासला कडवा विरोधच दाखविला आहे. अशा परिस्थितीत भारतातील काही लोक पॅलेस्टाइनला पाठिंबा देताना हमासच्या दहशतवादाला मात्र विरोध करताना दिसत नाहीत. काँग्रेस त्यात आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत थरूर यांचे हे विधान महत्त्वाचे ठरले आहे.

 

यासंदर्भात कम्युनिस्ट पक्षाचे नेते एम. स्वराज म्हणाले की, इंडिय़न युनियन मुस्लिम संघटनेच्या कार्यक्रमात थरूर यांनी इस्रायलच्या पाठीशी असल्याचेच जणू म्हटले आहे.

हे ही वाचा:

संरक्षण मंत्रालयाच्या प्रदर्शनात दिसली स्वदेशी शस्त्रांची ताकद

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

वडाळ्यात सापडला महिलेचा तुकडे केलेला मृतदेह

मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?

थरूर यांनी या टिकेबाबत म्हटले आहे की, काही लोकांनी माझ्या ३२ मिनिटांच्या भाषणातील छोटीशी गोष्ट निवडून त्यावरून वाद घालायला सुरुवात केली आहे. ते म्हणाले की, मला आश्चर्य वाटले की, माझ्या ३२ मिनिटांच्या भाषणातील २५ सेकंदांवर ते वाद घालू लागले आहेत. त्यात मी म्हटले आहे की, ७ ऑक्टोबरला जो दहशतवादी हल्ला झाला त्यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली आहे. पण त्यामुळे पॅलेस्टाइन लोकांच्या मानवअधिकारांना मी नाकारतो असे जर कुणाला वाटत असेल तर त्याबद्दल मी अधिक काही बोलू इच्छित नाही.

 

थरूर यांनी हमासला दहशतवादी म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर डाव्या आघाडीने तसेच हमासच्या पाठीराख्यांनी जोरदार टीका केली. इंडियन युनियन मुस्लीम लीग ही केरळमधील काँग्रेसप्रणित यूडीएफची सदस्य असलेली संघटना आहे. कोझिकोड येथे त्यांनी पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. गाझापट्टीत नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. पण थरूर यांनी इस्रायलमध्ये तसेच गाझापट्टीत निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचा उल्लेख केला तसेच ७ ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्याचाही विरोध केला आहे. त्यांनी म्हटले की, हा फक्त मुस्लिमांचा प्रश्न नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या मानवाधिकाराचा मुद्दा आहे.

Exit mobile version