काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा मुकाबला होताना दिसत आहे. जी-२३ नेते शशी थरूर यांनी गुरुवारी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेस हायकमांडच्या बाजूने सिब्बल यांच्या घराबाहेर निदर्शनं करणाऱ्यांचा विरोध करताना थरूर म्हणाले की, कपिल सिब्बल हे खरे काँग्रेसी आहेत. काँग्रेससाठी अनेक कायदेशीर लढाया त्यांनी लढल्या आहेत. “एक लोकशाही पक्ष म्हणून, त्यांचे काय म्हणणे आहे ते आपण ऐकले पाहिजे, जर तुम्ही त्यांच्या मताशी असहमत असाल तर असहमती दर्शवा पण हा योग्य मार्ग नाही.!” असं ट्विट थरूर यांनी केलं आहे.
That is shameful. We all know @KapilSibal as a true Congressman who has fought multiple cases in court for @INCIndia. As a democratic party we need to listen to what he has to say,disagree if you must but not in this way. Our priority is to strengthen ourselves to take on theBJP! https://t.co/XmtdHapach
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) September 30, 2021
पंजाबच्या संकटामुळे काँग्रेस विरुद्ध काँग्रेस संघर्ष समोर आला आहे. कारण कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी सुरू असलेल्या संघर्षामुळे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अमरिंदर सिंग यांच्या जागी चरणजीत सिंह चन्नी यांची नियुक्ती झाल्यानंतर सिद्धू यांनी चन्नी यांच्याशी मतभेद असल्याचे कारण देत पक्षाच्या प्रदेश युनिट प्रमुख पदाचा राजीनामा दिला. हायकमांडने राजीनामा स्वीकारला नसला आणि सिद्धू आपल्या पदावर कायम राहण्याची शक्यता असली तरी, उलथापालथ झाल्यामुळे काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अस्वस्थ केले आहे. हे नेते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत.
हे ही वाचा:
जेंव्हा दिग्विजय सिंग रा. स्व. संघ आणि अमित शहांची स्तुती करतात
सर्वोच्च न्यायालयाची ‘शेतकरी’ आंदोलकांना चपराक
… आता निश्चितच काँग्रेसमध्ये राहणार नाही
बंगालमध्ये मतदान केंद्रावर बॉम्बहल्ला करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक
जी-२३ नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी म्हटले की, हायकमांडच्या जवळचे मानले जाणारे लोक पक्ष सोडून जात आहेत हे विडंबनच आहे, तर जी-२३ नेते ज्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या अध्यक्षपदाची मागणी केली होती ते पक्षात राहतील आणि सुधारणांसाठी लढा देतील. सिब्बल म्हणाले की, पक्षाला अध्यक्ष नाही आणि त्यामुळे निर्णय कोण घेतो हे आम्हाला माहीत नाही. ते असेही म्हणाले की ते जी-२३ आहेत. जी हुजूर २३ नाहीतआणि म्हणूनच ते प्रश्न उपस्थित करत राहतील.